कालव्यात पडलेल्या सांबराला जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 09:45 PM2018-11-23T21:45:48+5:302018-11-23T21:46:04+5:30
गोसी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात पडलेल्या सांबराला मैत्र वन्यजीव संरक्षण संस्था आणि वनविभागाने जीवदान दिले. महत्प्रयासाने या सांबराला बाहेर काढून त्याला सुखरूप जंगलात सोडण्यात आल्याची घटना पवनी तालुक्यातील गुडेगाव येथे शुक्रवारी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गोसी प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात पडलेल्या सांबराला मैत्र वन्यजीव संरक्षण संस्था आणि वनविभागाने जीवदान दिले. महत्प्रयासाने या सांबराला बाहेर काढून त्याला सुखरूप जंगलात सोडण्यात आल्याची घटना पवनी तालुक्यातील गुडेगाव येथे शुक्रवारी घडली.
गोसी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या साखळी क्रमांक १७९६० परिसरात गुडेगाव वनविभागाच्या बिट क्रमांक ३१० मध्ये सांबर पडल्याची माहिती वनविभागाला शुक्रवारी सकाळी ९ वाजता मिळाली. धानोरीचे बिट रक्षक ए.व्ही. खेंते यांनी ही माहिती आपल्या वरिष्ठांसह मैत्रचे सचिव महाधव वैद्य यांना दिली. माहिती मिळताच मैत्रची टीम व वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सध्या गोसी धरणाचे पाणी कालव्यात नसल्याने सांबर मनुष्याचे अस्तित्व दिसताच घाबरून कोरड्या कालव्यातून सैरावैरा धावू लागले. त्यामुळे बचावात मोठी अडचण निर्माण झाली. चार तासाच्या प्रयत्नानंतर सांबराला कालव्याच्या बाहेर सुरक्षित काढण्यात आले.
या बचावासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी कोमल जाधव, मैत्रचे अध्यक्ष महादेव शिवरकर, बिट रक्षक एस.एस. करपते, ए.व्ही. खेंते, एच.एम. जायभाये, एन.पी. कंगाले, डी.एफ. राठोड, मदतनीस आर.एम. कुर्झेकर, आर.व्ही. जनबंधू, आर.के. रामटेके, टी.व्ही. कुंभले, देविदास क्षीरसागर, विठोबा मडावी, बकाराम वरठी तसेच मैत्रचे माधव वैद्य, रत्नपाल धारगावे, राहूल वाघमारे, महेश मठीया, प्रफूल्ल रामटेके, गजानन जुंबळे, अमोल वाघधरे, चंद्रकांत काटेखाये, चंदू देशमुख, चेतन हेडावू, मनोज भुरे आणि जगदीश रेवतकर यांनी परिश्रम घेतले.