जिवंत विद्युत तारांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 11:31 PM2017-10-25T23:31:57+5:302017-10-25T23:32:08+5:30
खापा येथील मुख्य चौरस्त्यावर भंडारा मार्गाच्या दिशेने उच्च विद्युत दाब प्रवाहीत करणारे वाहक हवेत झुलत आहेत. यामुळे येथून प्रवास करणाºयांचा जीव धोक्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : खापा येथील मुख्य चौरस्त्यावर भंडारा मार्गाच्या दिशेने उच्च विद्युत दाब प्रवाहीत करणारे वाहक हवेत झुलत आहेत. यामुळे येथून प्रवास करणाºयांचा जीव धोक्यात आला आहे.
उच्च विद्युत दाबाच्या वाहकांचे जमीनीपासून अंतर सुरक्षीततेच्या मापदंडात नसुन हवेत झुलत आहेत. खापा येथील मुख्य भंडारा मार्गावर उजव्या बाजुने उजव्या विद्युत वाहक मोठया झाडांच्या आळोश्याला लागूनच आहेत. खापा येथे चार दिशेला जोडणारा मुख्य चौरस्ता आहे. भंडारा मार्ग, रामटेक मार्ग, गोंदिया मार्ग तथा तुमसरवरुन मध्यप्रदेशाला जोडणारा हा नावाजलेला चौरस्ता आहे. याच चौरस्त्याच्याकडेला आहाराची व अल्पआहाराची अनेक दुकाने आहेत. प्रवाशी तथा जड वाहतुकीच्या वाहनधारकांसाठी जेवणाचे एकमात्र ठिकाण म्हणुन खापा चौक सर्वत्र प्रसिध्द आहे. चौकातील रस्त्याच्याकडेला ट्रक, ट्रॅक्टर यासारख्या जड भाडोत्री वाहनांची तसेच मालकीच्या प्रवाशी गाडयांची लांबलचक रांग येथे असते.
अश्या परिस्थितीत हवेत झुलणारे उच्च दाब वाहून नेणारे विद्युत वाहक धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. जड वाहनांची उंची व हवेत झुलणाºया विद्युत वाहकांच्या उंचीत क्वचितच फरक असतो.
रात्री-बे-रात्री चौकात धांबणाºयापैकी एखाद्या वेळेस वाहनधारक साहीत्य पाहणीकरिता वाहनाच्यावर चडतोच. क्षमतेनुसार जड वाहनांत भरलेल्या साहित्यांची उंची वाढून विद्युत वाहकांचा त्यांना स्पर्श झाला तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याच्या एकाकडेला रहीवासीवस्ती तर दुसºया कडेला पेट्रोलपंप आहे. त्यामुळे महावितरणने याची वेळीच दखल घेणे गरजेचे आहे.