लाखनीत जनावरांनी भरलेला ट्रक उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 09:59 PM2018-04-25T21:59:20+5:302018-04-25T21:59:20+5:30
येथील बसस्थानकासमोर जनावरांनी भरलेला मिनीडोअर ट्रक भरधाव वेगात रायपूरकडून नागपूरकडे जात असताना एका आॅटोला धडक दिल्यानंतर असंतुलित झाल्याने उलटला. या ट्रकमध्ये असलेल्या ११ म्हशी जखमी झाल्या. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : येथील बसस्थानकासमोर जनावरांनी भरलेला मिनीडोअर ट्रक भरधाव वेगात रायपूरकडून नागपूरकडे जात असताना एका आॅटोला धडक दिल्यानंतर असंतुलित झाल्याने उलटला. या ट्रकमध्ये असलेल्या ११ म्हशी जखमी झाल्या. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.
बसस्थानकासमोरील आॅटो क्र. एम.एच. ४० - ७०३७ ला मिनीडोअर ट्रक सी.जी. ०७ - २२०६ ने धडक दिली. मिनीडोअर ट्रक असंतुलीत झाल्याने राष्ट्रीय महामार्गावर उलटला. अवैधपणे जनावरे वाहून नेणार ट्रक उलटल्यानंतर ट्रकचा चालक व जनावरांचे मालक पळून गेले.
अपघात झाल्यानंतर ११ म्हशींना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. जखमी म्हशींवर प्राथमिक उपचार करून म्हशींना गोवर्धन गोवंश सेवा व गोविज्ञान अनुसंधान केंद्र, बरडकिन्ही येथे पाठविण्यात आले. ११ म्हशींची किंमत अंदाजे ५ लक्ष रुपये सांगण्यात येते.
लाखनी पोलिसांनी अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ट्रकमधील जनावरांची अवैधपणे वाहतूक होत असून ट्रकमधील ११ म्हशी कत्तलखान्यात नेण्यात येत असाव्यात असा अंदाज लाखनी पोलिसांनी व्यक्त केला आहे.