शिवभोजन थाळीसाठी भंडारात लाभार्थ्यांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 06:00 AM2020-02-01T06:00:00+5:302020-02-01T06:00:50+5:30

भंडारा शहरात महसूल विभाग आणि जिल्हा परिषदेच्या उपहारगृहात शिवभोजन थालीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्रिमुर्ती चौक स्थित महसूल उपहारगृहाचे संचालक राहूल लिमजे म्हणाले, आम्हाला एका दिवसासाठी १०० थाळीचे लक्ष दिले आहे. परंतु आमच्याकडे त्यापेक्षा अधिक लाभार्थी येतात. दुपारी १२ ते २ या वेळात शिवभोजन थाली दिली जाते.

Line of beneficiaries in the store for Shiv Bhoja plate | शिवभोजन थाळीसाठी भंडारात लाभार्थ्यांच्या रांगा

शिवभोजन थाळीसाठी भंडारात लाभार्थ्यांच्या रांगा

Next
ठळक मुद्देशहरात दोन ठिकाणी सुविधा : दहा रूपयात दोन पोळ्या, वरण आणि भाजी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी शिवभोजन थाली योजनेला भंडारा शहरात लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दहा रूपयात मिळणाऱ्या थाळीच्या नोंदणीसाठी रांगा लागल्याचे शहरातील दोनही केंद्रावर दिसून येत आहे. याठिकाणी लाभार्थ्यांना दोन पोळ्या, वरण आणि भाजी दिली जाते. मात्र दोनही ठिकाणी प्रत्येकी १०० थाळीचीच व्यवस्था असल्याने अनेकांना या योजनेपासून वंचित रहावे लागत आहे.
भंडारा शहरात महसूल विभाग आणि जिल्हा परिषदेच्या उपहारगृहात शिवभोजन थालीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्रिमुर्ती चौक स्थित महसूल उपहारगृहाचे संचालक राहूल लिमजे म्हणाले, आम्हाला एका दिवसासाठी १०० थाळीचे लक्ष दिले आहे. परंतु आमच्याकडे त्यापेक्षा अधिक लाभार्थी येतात. दुपारी १२ ते २ या वेळात शिवभोजन थाली दिली जाते. मात्र त्यासाठी अ‍ॅपवर नोंदणी केली जाते. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाते. येथील भोजनाचा दर्जाही उत्कृष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले. एक थाळी ५० रूपयात पडत असून यासाठी शासनाकडून ४० रूपये प्रती थाळी अनुदान मिळणार आहे. गोरगरीबांसाठी ही योजना असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या उपहारगृहातही अशीच अवस्था आहे. येथेही दुपारी १२ वाजतापासून शिवभोजन थाळीचा लाभ घेण्यासाठी रांग दिसून येते. एका थाळीत ३० ग्रॅम वजनाच्या दोन पोळ्या, १५० ग्रॅम वरण आणि १५० ग्रॅम भाजी दिली जाते. सदर केंद्र नवप्रभा लोकसंचालित साधन केंद्राद्वारा संचालन केले जाते. या केंद्राच्या संचालिका रंजना खोब्रागडे म्हणाल्या, अतिशय स्वस्त दरात भोजन उपलब्ध होत असल्याने वेळेपुर्वीच अनेकजण येथे रांग लावून असतात.
महसूल उपहारगृहात गत दोन दिवसांपासून भोजन करण्यासाठी येणाºया शहापूर येथील विजया अवाळ आणि लाखनीच्या पूनम येडेकर म्हणाल्या, येथे मिळणारे जेवण स्वादिष्ट असते. बाहेर मिळणाºया नास्त्याच्या किंमतीत येथे जेवण होते. तर आॅटो रिक्षा चालक सचिन बागडे म्हणाले, या योजनेने गोरगरीबांना वेळेवर दोन घास मिळतील.
सध्या या योजनेंतर्गत प्रत्येकी १०० म्हणजे दिवसभरात २०० जणांना शिवथाळी दिली जाते. परंतु अनेकांच्या पदरी निराशा येते. त्यामुळे अतिरिक्त शिवभोजन थाळी उघडण्याची गरज आहे.

अ‍ॅपच्या माध्यमातून पारदर्शकता
शिवभोजन थाळी वितरणात पारदर्शकता राखली जाते. येथे येणाºया प्रत्येकाची नोंदणी अ‍ॅपच्या माध्यमातून घेतली जाते. एवढेच नाही तर अ‍ॅपवर लाभार्थ्याचा फोटोही अपलोड केला जातो. ज्या लाभार्थ्याचा फोटो अ‍ॅपमध्ये अपलोड होता त्यालाच थाळी दिली जाते. आणि केंद्र चालकांना अनुदान मिळते. गुगल मॅप लोकेशनद्वारेही यावर लक्ष ठेवले जात आहे.

Web Title: Line of beneficiaries in the store for Shiv Bhoja plate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.