आधार बँक खात्याशी लिंक करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 06:00 AM2020-01-08T06:00:00+5:302020-01-08T06:00:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार लिंक नसणाऱ्या सभासदांची यादी सर्वच तहसील कार्यालयात प्रसिध्दीसाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार लिंक नसणाऱ्या सभासदांची यादी सर्वच तहसील कार्यालयात प्रसिध्दीसाठी सादर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी यादीत आपले नाव असल्यास त्वरीत आधार कार्ड, बँक पासबुकचे पहिले पान, मोबाईल क्रमांक नजिकच्या बँक शाखा किंवा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेत सादर करुन आधार कार्ड बँकेशी लिंक करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन व जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासन निर्णय २७ डिसेंबर रोजीचे आदेशान्वये राज्यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या शासन निर्णयान्वये योजनेचा तपशिल नमुद केलेला आहे.
त्यानुसार या योजनेंतर्गत भंडारा जिल्ह्यातील ज्या शेतकºयांकडील १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत उचल केलेल्या एक किंवा एकापेक्षा जास्त ज्या कर्ज खात्यात न झालेली रक्कम दोन लाख रुपयांपर्यंत आहे, अशा शेतकºयांचे अल्प, अत्यल्प भुधारक या प्रमाणे जमीन धारणेचे क्षेत्र विचारात न घेता, त्यांच्या कर्ज खात्यात दोन लाख रुपयापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ या योजनेंतर्गत देण्यात येणार आहे.
त्यानुषंगाने १ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली त्यांचे कार्यालयात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बँकांनी संबंधित शेतकºयांचे आधार क्रमांक बँक खात्याशी तातडीने संलग्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिलेले होते.
त्याप्रमाणे जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी जिल्ह्यातील बँकनिहाय सादर केलेल्या अहवालावरुन एकूण १,५६९ शेतकºयांनी अधार कार्ड बँकेत सादर केलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे लिंकींग झालेले नाही. भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनी त्यांचे सभासद असलेल्या ३६८ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची तालुका निहाय आधार कार्ड सादर केलेल्या सभासदांची यादी घेतली असता सात तालुके मिळून एकूण ४१५७ शेतकरी सभासदांनी आधार कार्ड सादर केलेले नाही.
अशा शेतकरी सभासदांची अॅनेक्चर-४ मध्ये बँकनिहाय, संस्थानिहाय व तालुकानिहाय यादी ग्रामपंचायत, चावडी, संस्था कार्यालय, बॅक शाखा येथे ७ जानेवारी रोजी प्रसिध्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आली आहेत. सदर लाभार्थी शेतकºयांनी यादीत आपले नाव असल्यास त्वरीत आधार कार्ड, बँक पासबुकचे पहिले पान, मोबाईल नंबर, नजिकच्या बँक शाखेत द्यावे, असे प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.