युवा माहिती दूत शासन व समाजामधील दुवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 10:39 PM2018-08-17T22:39:26+5:302018-08-17T22:39:49+5:30
युनिसेफच्या सहयोगाने राज्य शासनाचे उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण यांच्या प्रत्यक्ष सहभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने युवा माहिती दूत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. युवा माहिती दूत हे शासकीय योजनांचे लाभार्थी व शासन या मधील दुवा ठरतील, असा विश्वास पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी व्यकत केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : युनिसेफच्या सहयोगाने राज्य शासनाचे उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण यांच्या प्रत्यक्ष सहभागाने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने युवा माहिती दूत हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. युवा माहिती दूत हे शासकीय योजनांचे लाभार्थी व शासन या मधील दुवा ठरतील, असा विश्वास पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी व्यकत केला.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या युवा माहिती दूत या उपक्रमाच्या लोगोचे प्रकाशन स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य समारोहात महादेव जानकर यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर आयोजित कार्यक्रमात युवा माहिती दूत चित्रफित मंत्री तसेच अधिकारी यांना दाखविण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
जास्तीत जास्त युवकांनी युवा माहिती दूत हे मोबाईल अप्लीकेशन आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करुन युवा माहिती दूत व्हावे, असे आवाहन ना. जानकर यांनी केले.
जिल्हाधिकारी शांतनू गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
विविध शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयातील युवकांमार्फत शासकीय योजनांची माहिती प्रस्तावित लाभार्थ्यांपर्यंत थेटपणे पोहचविणे हे युवा माहिती दूत उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे.
प्रस्तावित लाभार्थ्यापर्यत न पोहचणाºया शासकीय योजना दुहेरी संवादातून त्यांच्यापर्यत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी राज्यातील समाजकायार्ची आवड असलेल्या उत्साही तरूण वगार्चे सहाय्य घेण्याचा युवा माहिती दूत या उपक्रमाचा महत्वाचा उद्देश आहे.
विविध समाज घटकातील (शेतकरी, महिला, आदिवासी, अल्पसंख्यांक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ज्येष्ठ नागरिक आदी.) असलेल्या वैयक्तिक लाभाच्या किमान ४० योजना, सामूहिक विकासाच्या ५ योजना आणि स्थानिक पातळीवर महत्वाच्या ५ योजना अशा एकूण ५० योजनांचा समावेश या उपक्रमासाठी केलेले असेल. या योजना माहिती दूत लाभार्थ्यांना समजावून सांगतील व लाभ घेण्यास प्रोत्साहित करतील.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माहिती दूत या उपक्रमाचे कौतुक करतांना जानकर म्हणाले की, शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे समाजकार्य हे माहिती दूत करणार आहेत.
यामुळे युवकांचा शासन व्यवस्थेत प्रत्यक्ष सहभाग वाढण्यास मोलाची मदत होईल.