साक्षरता म्हणजे सखोल व्यक्तिमत्व विकासाची संधी
By Admin | Published: September 11, 2015 01:04 AM2015-09-11T01:04:03+5:302015-09-11T01:04:03+5:30
मानव हा मुळात एक समाजाचा बुद्धीशील प्राणी आहे. त्यांच्या बुद्धीमत्तेत वाढ करण्यासाठी व्यक्तीला प्राथमिक स्वरूपात अक्षराची ओळख होणे महत्वाचे आहे.
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन : राजपूत यांचे प्रतिपादन
भंडारा : मानव हा मुळात एक समाजाचा बुद्धीशील प्राणी आहे. त्यांच्या बुद्धीमत्तेत वाढ करण्यासाठी व्यक्तीला प्राथमिक स्वरूपात अक्षराची ओळख होणे महत्वाचे आहे. त्या अक्षराचे मानवी व देशाच्या विकास प्रक्रियेला चालना देते. साक्षरता म्हणजे सखोल व्यक्तीमत्व विकासाची संधी आहे, असे प्रतिपादन प्रा.एन.राजपूत यांनी केले.
प्रगती महिला महाविद्यालय भंडारा येथे निरंतर प्रौढ शिक्षण आणि विस्तार सेवा विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कार्यक्रम घेण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.जी. पाखमोडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. राजपूत, कार्यक्रमाचे संयोजक प्रा. ए.बी. चवरे यांच्या उपस्थितीत पार पडला.
प्राचार्य डॉ. जी.जी. पाखमोडे म्हणाले, आज मानवाला जल साक्षरतेची अत्यंत महत्वाची आवश्यकता आहे.
आज पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी पाण्याचा प्रश्न तयार झाला आहे. म्हणून पाण्याचा वापर, पाण्याची उपयोगिता लक्षात घेवून त्याचा योग्यरित्या उपयोग केला पाहिजे.
तसेच आधुनिक काळ हे तांत्रिकज्ञान, संगणकाचे युग आहे. याकरिता व्यक्तीने अशा साधनाच्या बाबतीत साक्षर होणे आज काळाची गरज आहे, असे मार्गदर्शन केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. ए.बी. चवरे यांनी केले. संचालन अर्चना डोरले व आभार जयश्री समरीत हिने मानले. कार्यक्रमासाठी प्रा. विजया लिमसे, प्रा. क्रिष्णा पासवान, प्रा. कल्पना निंबार्ते, प्रा. एस.एस. राठोड, प्रा. जी.एन. कळंबे, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थीनी यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)