धान पिकाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 10:08 PM2018-09-21T22:08:22+5:302018-09-21T22:09:06+5:30

हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज तंतोतंत खरा ठरत शुक्रवारी सकाळपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. नऊ तासात २४.७७ मी.मी. पाऊस कोसळल्याने धान पिकाला जीवदान मिळाले. गत तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. मात्र शुक्रवारी झालेल्या पावसाने शेतकºयांच्या चेहºयावर समाधान दिसून आले.

Livelihood of paddy crop | धान पिकाला जीवदान

धान पिकाला जीवदान

googlenewsNext
ठळक मुद्देहवामानाचा अंदाज तंतोतंत खरा : तीन आठवड्यानंतर पाऊस बरसला

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज तंतोतंत खरा ठरत शुक्रवारी सकाळपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. नऊ तासात २४.७७ मी.मी. पाऊस कोसळल्याने धान पिकाला जीवदान मिळाले. गत तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. मात्र शुक्रवारी झालेल्या पावसाने शेतकºयांच्या चेहºयावर समाधान दिसून आले.
जिल्ह्यात गत २६ आॅगस्टनंतर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे धान पीक धोक्यात आले होते. तापमानातही प्रचंड वाढ झाली होती. पावसासाठी शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागले होते. अशातच दोन दिवसापुर्वी हवामान खात्याने भंडारासह विदर्भात २१ सप्टेंबरपासून पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तविला.
नेहमी अंदाज चुकणाºया हवामान खात्याचा अंदाज मात्र यावेळेस तंतोतंत खरा ठरला आणि गुरूवारी रात्रीपासूनच आकाशात ढग जमू लागले. रात्री ९ वाजताच्या सुमारास हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. शुक्रवारी सकाळी ९ वाजतापासून जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला. सुरूवातीला रिमझिम असलेला पाऊस दुपारी १२ नंतर जोरदार बरसायला लागला.
पाण्यासाठी आसुसलेला धान या पावसाने ओलाचिंब झाला. माना टाकनारे पीक तरारून आले. शेतकºयांच्या चेहºयावरही समाधान फुलले. जिल्ह्यात एक लाख ७४ हजार हेक्टरवरील धान पीक पावसाअभावी धोक्यात आले होते. दोन पाण्याने धान हातचा जाण्याची भिती निर्माण झाली होती. मात्र शुक्रवारी झालेल्या पावसाने धान पीकाला जीवदान मिळाले.
जिल्ह्यातील सातही तालुक्यात पावसाने हजेरी लावली. सर्वाधिक पाऊस भंडारा तालुक्यातील शहापूर मंडळात ५५ मी.मी. कोसळला तर तुमसर तालुक्याच्या गर्रा येथे ५० मी.मी. पावसाची नोंद झाली. सर्वात कमी पाऊस लाखांदूर तालुक्याच्या सानगडी सर्कलमध्ये ६ मी.मी. झाला. शुक्रवारी सकाळी ८ वाजतापासून सायंकाळपर्यंत जिल्ह्यात २४.८२ मी.मी. पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी दिली.
भंडारा शहरात दुपारी १२ वाजताच्या सुमारास एक तास धुवाधार पाऊस कोसळला. शहराच्या गांधी चौक, खात रोड, खांबतलाव, बसस्थानक परिसरात पावसाचे पाणी जमा झाले होते.
पावसाने लोंबी भरण्यास मदत
पवनी : सध्या हलक्या प्रतीचे भात पीक लोंबीवर आले आहे. लोंबी भरण्यासाठी पावसाची नितांत गरज होती. योग्यवेळी पवनी तालुक्यात पाऊस बरसल्याने आता हलक्या प्रतीचे भात पीक चांगले होईल, असे शेतकºयांना वाटत आहे.
साकोलीत दमदार हजेरी
साकोली : दीर्घ प्रतिक्षेनंतर पावसाचे आमगण झाल्याने साकोली तालुक्यातील शेतकºयांच्या चेहºयावर समाधान दिसून आले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता पावसाला सुरूवात झाली. हलक्या आणि उच्च प्रतिच्या धानासाठी पाऊस अत्यंत आवश्यक होता. शुक्रवारी बरसलेल्या पावसाने शेतकºयांनी निश्वास सोडला.
लाखनीत जनजीवन प्रभावित
लाखनी : लाखनी शहरासह तालुक्यात गुरूवारच्या रात्री पावसाची सर कोसळली. शुक्रवारी सकाळी जोरदार पाऊस झाल्याने जनजीवन प्रभावित झाले. परंतु शेतकºयांच्या चेहºयावर समाधान दिसत होते.
नऊ तासात २४.७७ मिमी पाऊस
जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून सायंकाळपर्यंत २४.७७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यात सर्वाधिक पाऊस लाखनी तालुक्यात ४५.५८ मिमी झाला. त्याखालोखाल पवनी ३०.४ मिमी, तुमसर २९ मिमी, भंडारा २७ मिमी, मोहाडी १६ मिमी, लाखांदूर १५ मिमी आणि साकोली १०.२ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाने कुठेही नुकसान झाल्याची माहिती नाही.
तापमानात १० अंशाने घट
गुरूवारी रात्रीपासून ढगाळ वातावरण आणि वेगाने वारा वाहायला लागल्याने तापमानात मोठी घट दिसून आली. गुरूवारी दिवसभºयाचे तापमान ३६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले होते. शुक्रवारी झालेल्या पावसाने १० अंश खाली येवून तापमान २६ अंशावर आले. यामुळे प्रचंड उकाड्यातून नागरिकांची सुटका झाली.
 

Web Title: Livelihood of paddy crop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.