बोथली येथे पशुधन वंध्यत्व शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:36 AM2021-09-11T04:36:19+5:302021-09-11T04:36:19+5:30
तथापि, ९० जनावरांची गर्भ तपासणी, १४० जनावरांचे गोचीड निर्मूलन, ६ श्वानांना श्वान प्रतिबंधक लसीकरण, २०० जनावरांना जंतनाशक औषध व ...
तथापि, ९० जनावरांची गर्भ तपासणी, १४० जनावरांचे गोचीड निर्मूलन, ६ श्वानांना श्वान प्रतिबंधक लसीकरण, २०० जनावरांना जंतनाशक औषध व ७२ जनावरांना औषध उपचार करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन लाखांदूर पंचायत समितीच्या माजी सभापती मंगला बगमारे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, शिबिराला अध्यक्ष म्हणून बोथलीचे सरपंच कैलास बांडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य उमेश बगमारे, मुख्याध्यापक जांभुळकरसह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी आयोजित शिबिरात बोथली परिसरातील शेकडो शेतकरी, नागरिकांसह पशुधन विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. संचालन मोटघरे यांनी केले तर आभार तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. सोनकुसरे यांनी मानले.
100921\1442-img-20210909-wa0038.jpg
व्यंधत्व शिबीरात ऊपचार करतांना