प्रशिक्षणार्थ्यांनी ठोकले प्रशिक्षण संस्थेला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:55 AM2018-04-27T00:55:41+5:302018-04-27T00:55:41+5:30

येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला अनेक समस्यांनी ग्रासले असून, मागील काही वर्षांपासून येथे नियमित प्रशिक्षक नाही, मशीन बंद, कॉम्प्युटर बंद अशा विविध समस्यांची भर पडली आहे, याचा परिणाम प्रशिक्षणार्थ्यांना भोगावा लागत असतो.

The locals lock the training institute | प्रशिक्षणार्थ्यांनी ठोकले प्रशिक्षण संस्थेला कुलूप

प्रशिक्षणार्थ्यांनी ठोकले प्रशिक्षण संस्थेला कुलूप

googlenewsNext
ठळक मुद्देलाखांदूर येथील प्रकार : प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरुच

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला अनेक समस्यांनी ग्रासले असून, मागील काही वर्षांपासून येथे नियमित प्रशिक्षक नाही, मशीन बंद, कॉम्प्युटर बंद अशा विविध समस्यांची भर पडली आहे, याचा परिणाम प्रशिक्षणार्थ्यांना भोगावा लागत असतो. वरिष्ठ सहसंचालक यांच्याकडे अनेकदा तक्रार करत, स्मरणपत्र सुद्धा देण्यात आले आहे. मात्र याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांनी गुरूवारला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून आंदोलनाला प्रारंभ केला आहे.
या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत गेल्या काही वर्षांपासून स्थायी प्राचार्य नसल्याने प्रभारी प्राचार्य धुरा सांभाळीत आहेत. येथील समस्या पाहता विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. समस्यांमध्ये संस्थेत नियमित प्रशिक्षक नाही. वेल्डर ट्रेंड मधील ९० टक्के मशिन बंद पडले आहेत. 'आयटी'हा विषय संस्थेत कधीच शिकविल्या जात नाही. त्यामुळे संगणकाच्या ज्ञानापासून वंचित राहावे लागते. भविष्यातील आॅनलाईन परीक्षेच्या दृष्टीने सराव होण्याकरिता संस्थेत कॉम्प्युटर कक्ष असावा, मात्र तो पण नाही. कोपा ट्रेंडमध्ये बरेचसे कॉम्प्युटर बंद पडले आहेत. साहित्याची कमतरता आहे. तर थंड व स्वछ पाण्यासाठी विद्यार्थ्यांना वणवण भटकावे लागते.
सदर समस्या प्रशिक्षणार्थ्यांनी प्राचार्यांच्या लक्षात आणून दिल्या असता, 'माझे सेवानिवृत्तीचे दोन महिने राहिले म्हणून आता कुठलीही भानगड करू नका.' असे त्यांनी उत्तर दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी न्याय हक्कासाठी सहसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नागपूर यांना १२ एप्रिलला विद्यार्थ्यांच्या निवेदन पाठविले होते. मात्र दहा दिवसाचा काळ लोटूनही कुणीच दखल घेतली नसल्याने गुरूवारला सकाळी ११ वाजतापासून संस्थेच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून ठिय्या आंदोलन चालू केले आहे.
या आंदोलनात सुनिल दुनेदार, सतीश हुकरे, महेश बन्सोड, गणेश बेडवर, प्रशांत भेंडारकर, गौरीशंकर मेहंदळे, प्रमोद बावनकुळे, कानोज कावळे, अंबर मिसार, आकाश देशमुख, विनय नंदेश्वर, रीना टेंभुर्णे, अश्विनी बनकर, मयुरी देशमुख, सरोज रंगारी, श्रीकांत गजभिये, हर्षल शहारे यांच्यासह ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
सकाळी ११ वाजतापासून आंदोलन सुरू झाले असून, अद्याप प्रशिक्षणार्थ्यांच्या समस्यांची कुणीही दखल घेतली नाही. जोवर आपल्या समस्यांचा निर्वाडा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार, अशी भूमिका प्रशिक्षणार्थ्यांनी घेतली आहे.

Web Title: The locals lock the training institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.