तुमसर रोड रेल्वे समितीत स्थानिकांना डावलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:37 AM2021-02-05T08:37:55+5:302021-02-05T08:37:55+5:30

तुमसर रोड येथील रेल्वे स्थानक समितीत स्थानिक नागरिकांना डावलून ग्रामीण राजकीय पदाधिकाऱ्यांच्या पहिल्यांदा समावेश केला आहे. केवळ देव्हाडी येथील ...

Locals rallied in Tumsar Road Railway Committee | तुमसर रोड रेल्वे समितीत स्थानिकांना डावलले

तुमसर रोड रेल्वे समितीत स्थानिकांना डावलले

Next

तुमसर रोड येथील रेल्वे स्थानक समितीत स्थानिक नागरिकांना डावलून ग्रामीण राजकीय पदाधिकाऱ्यांच्या पहिल्यांदा समावेश केला आहे. केवळ देव्हाडी येथील सरपंचांचा समावेश समितीत आहे. नियमानुसार स्थानिक पदाधिकाऱ्यांना समितीमध्ये स्थान देण्याची गरज होती; परंतु प्रथमच रेल्वे प्रशासनाने ग्रामीण भागातील राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश केला आहे. त्यासंदर्भात विभागीय रेल्वे महाव्यवस्थापकांकडे तक्रार करण्यात आली आहे.

रेल्वेस्थानकाच्या समस्या स्थानिकांना जास्त माहीत असताना रेल्वेचा त्यांना अभ्यास असतो. समितीमध्ये पत्रकार, वकिलांचा समावेश करण्याचा नियम आहे; परंतु यावेळी या पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आले आहे. राजकीय दबावापोटी समिती तयार करण्यात आली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Locals rallied in Tumsar Road Railway Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.