लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:32 AM2021-04-14T04:32:26+5:302021-04-14T04:32:26+5:30
मोहाडी : तालुक्यात व मोहाडी शहरात कोरोनाचा वाढता प्रकोप बघता ‘ब्रेक द चेन’साठी सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवून कडक ...
मोहाडी : तालुक्यात व मोहाडी शहरात कोरोनाचा वाढता प्रकोप बघता ‘ब्रेक द चेन’साठी सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवून कडक लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
आमदार राजू कारेमोरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार सायंकाळी व्यापारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. त्यात वाढत्या कोरोना रुग्णाांबद्दल चिंता व्यक्त करून खबरदारीचा उपाय व कोरोना रुग्ण साखळी तोडण्याच्या उद्देशाने मोहाडी तालुक्यात कडक लाॅकडाऊन करण्याच्या विचाराशी सर्वांनी सहमती दर्शविल्याने १४ एप्रिल ते १८ एप्रिलपर्यंत सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या काळात कुणीही नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर रस्त्यावर फिरताना दिसले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. या कालावधीत फक्त औषधी दुकान व रुग्णालये, शासकीय, निमशासकीय कार्यालयेच उघडी राहतील. या व्यतिरिक्त इतर सर्व प्रकारची आस्थापने, दुकाने बंद राहणार आहेत. सभेला शहरातील राजकीय पदाधिकारी, व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी, पत्रकार, नगर पंचायत, तहसील कार्यालय व पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.