लाखो रुपयांची इमारत कुलूपबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 12:41 AM2017-08-30T00:41:54+5:302017-08-30T00:42:12+5:30
तुमसर पंचायत समितीच्या आवारात महिला बचत गट साहित्य विक्री व प्रदर्शनी केंद्राकरिता ५० लाखांची इमारत तयार करण्यात आली.
मोहन भोयर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर पंचायत समितीच्या आवारात महिला बचत गट साहित्य विक्री व प्रदर्शनी केंद्राकरिता ५० लाखांची इमारत तयार करण्यात आली. मूलभूत सोयी सुविधांच्या अभावी ही इमारत सध्या रिकामी पडून आहे. परिसरातील कुत्र्यांचे ते आश्रयस्थान बनले आहे. इमारत लोकार्पणाचा येथे मुहूर्त केव्हा पार पडणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा भंडारा अंतर्गत तुमसर येथे दोन वर्षापुर्वी महिला बचत गट निर्मित साहित्य विक्री व प्रदर्शनीसाठी सुमारे ५० लाख रूपये खर्चून इमारत बांधकाम केले. सहा ते आठ महिन्यापूर्वी इमारत तयार झाली. इमारत सध्या रिकामी पडून आहे. इमारतीत इलेक्ट्रीक फिटींगची कामे झाली नाहीत, अशी माहिती आहे. वीज कनेक्शनची कामे येथे प्रलंबित आहे. या कामासाठी पुन्हा पाच लाखांच्या निधीची गरज आहे.
ग्रामीण महिलांच्या साहित्याची विक्री व्हावी. त्या साहित्यांचा प्रसार व प्रचार व्हावा. त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे याकरिता तालुकास्तरावर शासनाने सुमारे ५० लाखांची इमारत तयार केली. शासन व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सध्या ही इमारत रिकामी पडून आहे. येथे इमारत अद्यावत करुन लोकार्पणासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
जिल्हास्तरावरील जिल्हा परिषद प्रशासनाच्या अखत्यारित ही योजना कार्यान्वित केली जाते. प्रकल्प संचालक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नियंत्रणात हा उपक्रम आहे. तुमसर येथील इमारत परिसरात सध्या कुत्र्यांचे आश्रयस्थान बनले आहे. शासकीय योजनांचा फज्जा कसा उडतो ते येथे दिसून येते. मोठा गाजावाजा करुन इमारतीचे बांधकाम करण्यात आले. स्थानिक पदाधिकाºयांनी येथे लक्ष घालण्याची गरज आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना या इमारतीबाबद माहिती देण्यात आली. परंतु अद्यापपर्यंत कारवाई झाली नाही. इमारतीत इलेक्ट्रीक फिटींगची कामे झाली नाही. सुमारे पाच लाखांचा खर्च येथे अपेक्षीत आहे.
हिरालाल नागपूरे
गटनेते पं.स. तुमसर