Lok Sabha Election 2019; भाजपच्या सर्व घोषणा ठरल्या फोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 10:36 PM2019-04-08T22:36:11+5:302019-04-08T22:37:32+5:30
भाजप सरकारने २०१४ च्या निडणुकीत अच्छे दिन, स्वस्त पेट्रोल व बेरोजगारांना रोजगार देण्याची घोषणा केली होती. तसेच विकसीत देश बनवून शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार, मजुरांना दररोज काम देण्याचे आश्वासन दिले. मात्र मागील पाच वर्षांत यापैकी एकाही आश्वासनाची पुर्तत: केली नाही. भाजप सरकारच्या सर्व घोषणा फोल ठरल्या असल्याचा आरोप खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला. कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारार्थ लोकसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भाजप सरकारने २०१४ च्या निडणुकीत अच्छे दिन, स्वस्त पेट्रोल व बेरोजगारांना रोजगार देण्याची घोषणा केली होती. तसेच विकसीत देश बनवून शेतकऱ्यांचे अश्रू पुसणार, मजुरांना दररोज काम देण्याचे आश्वासन दिले. मात्र मागील पाच वर्षांत यापैकी एकाही आश्वासनाची पुर्तत: केली नाही. भाजप सरकारच्या सर्व घोषणा फोल ठरल्या असल्याचा आरोप खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला.
कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुद्धे यांच्या प्रचारार्थ लोकसभा क्षेत्रातील ग्रामीण भागात आयोजित प्रचार सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
खासदार पटेल म्हणाले, प्रधानमंत्री मोदी आपल्या भाषणात शत्रू देशाला धारेवर धरत आहेत. मात्र वास्तवीक त्यांना शुभेच्छा संदेश पाठविले जात आहेत.
मागील पाच वर्षांत भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या विकासाकडे राज्य व केंद्र शासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे येथील जनता बघत आहे. हीच जनता आता भाजप सरकारने दिलेल्या आश्वसनांचा हिशोब मागत असल्याचेही पटेल म्हणाले. सभांना माजी आमदार दिलीप बंसोड, पंचम बिसेन, योगेंद्र भगत, विनोद हरिणखेडे, राजलक्ष्मी तुरकर, राधेलाल पटले, निता रहांगडाले, रमेश अंबुले, जगदीश अग्रवाल यांच्यासह मोठ्या संख्येत मतदार उपस्थित होते.