Lok Sabha Election 2019; लोकसभा निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:49 AM2019-04-10T00:49:55+5:302019-04-10T00:51:02+5:30
विकासाचा मुद्दा घेवून भाजप ही निवडणूक लढवित आहे. मात्र ही निवडणूक गल्लीची नव्हे तर दिल्लीची असून राष्ट्रीय अस्मिता जपणारी आहे. पूर्वीच्या अन्याय, अत्याचारी, दुराचारी व भ्रष्टाचारी सरकारला थारा न घालता विकासात्मक वाटचाल करणाऱ्या भाजपचे हात मजबूत करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विकासाचा मुद्दा घेवून भाजप ही निवडणूक लढवित आहे. मात्र ही निवडणूक गल्लीची नव्हे तर दिल्लीची असून राष्ट्रीय अस्मिता जपणारी आहे. पूर्वीच्या अन्याय, अत्याचारी, दुराचारी व भ्रष्टाचारी सरकारला थारा न घालता विकासात्मक वाटचाल करणाऱ्या भाजपचे हात मजबूत करा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
भंडारा येथील दसरा मैदानात मंगळवारी सायंकाळी आयोजित भाजप-शिवसेना प्रणीत युतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेला ते संबोधित करीत होेते. यावेळी मंचावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार अॅड. रामचंद्र अवसरे, माजी खासदार शिशुपाल पटले, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, म्हाडाचे सभापती तारिक कुरैशी, उमेदवार सुनील मेंढे, आशु गोंडाणे, मुकेश थानथराटे, असित बागडे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विदर्भात पहिल्या टप्प्यात लोकसभा निवडणूक होत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पूर्व विदर्भातून उमेदवाराच्या रूपाने सुनील मेंढे यांना ओपनिंग बॅट्समन म्हणून संधी दिली आहे. ते प्रचंड मताधिक्याने निवडून येतील यात शंका नाही. विकासाच्या मुद्यावर भाजप निवडणूक लढवित असून भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात बऱ्याच कामांना गती देण्यात आली आहे.
भंडारातही नगराध्यक्ष मेंढे यांनी पाणीपुरवठा योजना, भूमिगत गटार योजना, एलईडी पथदिवे यासारख्या विकासात्मक कामांना प्राधान्य दिले, असे त्यांनी सांगितले.
काँग्रेस-राष्ट्रवादीवर निशाणा साधून मुख्यमंत्री म्हणाले, सर्जीकल स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे अड्डे उदध्वस्त करणाºया सैन्याला काँग्रेस-राष्ट्रवादी पुरावे मागत आहे. ही बाब देशासाठी शरमेने मान खाली घालणारी आहे.
गरीबांना वार्षिक ७२ हजार रूपये देण्याची घोषणा करणाºया काँग्रेसने पैसा कुठून व कसा आणणार हे मात्र सांगितले नाही. दुसरीकडे गरीबांचा पैसा गरीबांना कसा मिळेल, अशी व्यवस्था प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. स्वच्छ भारत अभियान, पंतप्रधान आवास योजना, उज्वला योजना, मुद्रा लोन, आयुष्यमान भारत, कामगार, लहान व्यवसायीकांसह शेतकऱ्यांना पेंशन देण्याचा महत्वाकांक्षी निर्णयही मोदी सरकारने घेतला आहे. सर्वांच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. खºया अर्थाने भाजपचे शासन देशाला विकासाकडे घेवून जाणारे असून भाजप उमेदवाराचे हात बळकट करावे, असेही आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. सभेचे संचालन व आभार नगरसेवक संजय कुंभलकर यांनी केले.