Lok Sabha Election 2019; आता मूक प्रचारावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 01:02 AM2019-04-10T01:02:09+5:302019-04-10T01:03:52+5:30

निवडणूक आयोगाने उमेदवारांना जाहीर प्रचारासाठी २९ मार्च ते ९ एप्रिलच्या सायंकाळपर्यंतचा कालावधी दिला होता. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी प्रचार तोफा थंडावल्या आहेत. येथूनच खऱ्याअर्थाने मूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. या दोन दिवसातच खरा कस लागणार आहे.

Lok Sabha Election 2019; Now focus on silent propaganda | Lok Sabha Election 2019; आता मूक प्रचारावर भर

Lok Sabha Election 2019; आता मूक प्रचारावर भर

googlenewsNext
ठळक मुद्देखेळ मनी पॉवरचा : व्होटर स्लिप वाटपाचे कार्यही जोमात

इंद्रपाल कटकवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : निवडणूक आयोगाने उमेदवारांना जाहीर प्रचारासाठी २९ मार्च ते ९ एप्रिलच्या सायंकाळपर्यंतचा कालावधी दिला होता. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी प्रचार तोफा थंडावल्या आहेत. येथूनच खऱ्याअर्थाने मूक प्रचाराला सुरुवात झाली आहे. या दोन दिवसातच खरा कस लागणार आहे.
एखाद्या विद्यार्थ्याने वर्षभर अभ्यास करून पेपरच्या एक दिवस आधी याप्रमाणे रिव्हिजन केली जाते. तशीच रिव्हीजन लोकसभेतील १४ उमेदवारांना प्रचार यंत्रणेतील सुटलेल्या भागांची करावी लागणार आहे.
जाहीर प्रचाराकरिता कायदेशीरदृष्ट्या बंद असल्याने कुठलाही गाजावाजा न करता थेट शेवटची बोलणी विविध बैठकांमधून केली जाते. आता भूमिका मांडण्याऐवजी हो की नाही ते बोला, काय हवे ते सांगा, अशा शब्दात उमेदवारांकडून मन वळविण्याचा प्रयत्न करणे सुरु झाले आहे.
निवडणूक जिंकण्यासाठी रिंगणात उतरलेल्या उमेदवारांकडून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्नांची पराकाष्टा केली जाते. जाहीर प्रचारानंतरच्या मूक प्रचारालाही निवडणुकीमध्ये विशेष महत्त्व आहे. अनेक वेळा शेवटच्या दोन दिवसातच निवडणुकीचे चित्र पालटल्याची अनेक उदाहरणे आहेत. विशेषत: या दोन दिवसामध्ये अफवांचे पेव फुटण्याची भीती मोठ्या प्रमाणात राहते.
या माध्यमातूनच अनेकांकडून स्वत:साठी अनुकूल असे राजकीय वातावरण तयार केले जाते. विशेषत: एखाद्या समाजाशी किंवा जातीशी जुळलेली गठ्ठा मते मिळविण्यासाठी या दिवसांमध्ये नियोजनबद्ध प्रयत्न केले जातात. मतदार याद्या पाठविणे, बुथ लावणे याचेही नियोजन उमेदवारांकडून केले जाते. या नियोजनावरच विजयाचे गणित बऱ्याचअंशी अवलंबून असते. जिवाचे रान करून जाहीर प्रचार केल्यानंतर त्याचे चीज करून घेण्याची शेवटची संधी म्हणजे मूक प्रचारासाठी मिळालेला दोन दिवसांचा कालावधी होय.

Web Title: Lok Sabha Election 2019; Now focus on silent propaganda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.