Lok Sabha Election 2019;  महिला मतदारांची भूमिका निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 09:59 PM2019-03-26T21:59:22+5:302019-03-26T21:59:57+5:30

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात महिला मतदारांची संख्या वाढल्याचे २००९ आणि २०१४ या वर्षाच्या आकडेवारीवर नजर घातल्यास दिसून येते. त्यावेळी दोन्ही जिल्ह्यांमिळून एकूण मतदार संख्या १६.३० लाखांच्या वर गेली होती. आता त्यात चांगलीच वाढ झाली आहे.

Lok Sabha Election 2019; Role of women voters is crucial | Lok Sabha Election 2019;  महिला मतदारांची भूमिका निर्णायक

Lok Sabha Election 2019;  महिला मतदारांची भूमिका निर्णायक

Next
ठळक मुद्देचुरस वाढणार : प्रत्येक वेळी वाढतेय संख्या, प्रचारातही महिलांचा सक्रिय सहभाग

इंद्रपाल कटकवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात महिला मतदारांची संख्या वाढल्याचे २००९ आणि २०१४ या वर्षाच्या आकडेवारीवर नजर घातल्यास दिसून येते. त्यावेळी दोन्ही जिल्ह्यांमिळून एकूण मतदार संख्या १६.३० लाखांच्या वर गेली होती. आता त्यात चांगलीच वाढ झाली आहे. यावेळी एकूण मतदार संख्या १७ लाख ९१ हजार ६५२ असून त्यापैकी महिला मतदारांची संख्या ८ लाख ९४ हजार २१२ इतकी आहे. जवळपास महिला मतदारांची संख्या एकूण मतदारांच्या निम्मी आहे. परिणामी महिला मतदारांची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे.
महिलांना राजकारणात समान संधी मिळण्यासाठी शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के आरक्षण जाहीर केले.
कालपर्यंत केवळ घर सांभाळणारी स्त्री जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, नगर परिषदांचा कारभारात आपला ठसा उमटविताना दिसत आहे. मात्र, अनेक ठिकाणी ‘सौ’ऐवजी त्यांचे ‘श्री’च कारभार हाकतानाही दिसून येतात.
महिला आरक्षणाचे चित्र केवळ कागदावर न राहता, नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये प्रतिबिंबित होणे गरजेचे आहे.
खऱ्या अर्थाने महिला आरक्षणामागील हेतू सफल होणार असल्याने अनेक ठिकाणी आता महिलांनी सक्रिय होण्यास सुरूवात केली आहे. त्यातच आता मतदानातील जवळपास अर्धा वाटाही महिलांचा झाला आहे. निवडणूक विभागाने मतदार नोंदणीसाठी जनजागृती अभियान राबविले. विशेष नोंदणी मोहिमेतही महिला मतदारांची संख्या वाढली. महिला आपल्या हक्कांसाठी जागृत होत असल्याचे मतदार नोंदणीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते.
तीन विधानसभा क्षेत्रात महिला मतदारांची संख्या अधिक
साधारणत: पुरूष मतदार मतदारांची संख्या मतदार यादीत अधिक दिसून येते. परंतु भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील मतदार संख्येवर नेजर टाकल्यास भंडारा, तिरोडा आणि गोंदिया विधानसभा क्षेत्रात महिला मतदारांची संख्या पुरूषांपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते. गोंदिया विधानसभा क्षेत्रात पाच हजार ७५१, तिरोडा विधानसभा क्षेत्रात २००७ आणि भंडारा विधानसभा क्षेत्रात १४४ महिला मतदार पुरूषांपेक्षा अधिक असल्याचे दिसून येते.

Web Title: Lok Sabha Election 2019; Role of women voters is crucial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.