Lok Sabha Election 2019; जिल्ह्यातील २२ शासकीय विश्रामगृहात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 09:48 PM2019-03-28T21:48:07+5:302019-03-28T21:49:15+5:30

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आणि जिल्ह्यातील २२ विश्रामगृह आदर्श आचारसंहितेमुळे एकदम सुनसान पडले आहे. एरवी राजकीय नेते, कार्यकर्त्यांची वर्दळ असायची. केवळ अधिकाऱ्यांच येथे राहण्याची मुभा आहे.

Lok Sabha Election 2019; Shukushkat in 22 Government Houses of the District | Lok Sabha Election 2019; जिल्ह्यातील २२ शासकीय विश्रामगृहात शुकशुकाट

Lok Sabha Election 2019; जिल्ह्यातील २२ शासकीय विश्रामगृहात शुकशुकाट

Next
ठळक मुद्देआदर्श आचारसंहिता : राजकीय नेत्यांची गर्दी ओसरली, अधिकाऱ्यांनी टाकला डेरा

देवानंद नंदेश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आणि जिल्ह्यातील २२ विश्रामगृह आदर्श आचारसंहितेमुळे एकदम सुनसान पडले आहे. एरवी राजकीय नेते, कार्यकर्त्यांची वर्दळ असायची. केवळ अधिकाऱ्यांच येथे राहण्याची मुभा आहे.
भंडारा जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत २२ विश्रामगृह व विश्रामभवन आहेत. यात भंडारा येथे असलेल्या विश्राम भवनात वातानुकुलीत सहा सुट आणि साधे चार सुट आहेत. तसेच लाखनी, साकोली, लाखांदूर, पवनी, मोहाडी व तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथे प्रत्येकी दोन सुट आहेत. निवडणुकीची घोषित होताच १० मार्चपासून आचारसंहिता लागू होते. राजकीय पदाधिकाऱ्यांची वाहने, सामान्य जणांसह विशेषांकडे असणारी शस्त्रेही जमा करावी लागतात. सार्वजनिक ठिकाणी दंगा धोपा होईल अशी कृत्ये किंवा हरकतींवर प्रशासनाची करडी नजर असते. आचारसंहितेचे उल्लंघन करणाºयांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येतो.
विशेषत: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह व परिसरात कुठलाही उमेदवार सभा किंवा कार्यक्रम घेऊ शकत नाही. संबंधित विश्रामगृहाचे सूट केवळ निवडणूक कार्यात सहभागी असणारे अधिकारी, सतर्कता समिती याशिवाय भरारी पथकांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. याशिवाय वरिष्ठ पातळीवर भेट देणारे अधिकारीसुद्धा याच विश्रामगृहात निवडणुका संदर्भाची बैठक घेणार आहेत. त्यामुळे वर्षभर कुठल्या न कुठल्या कारणाने गजबजलेले विश्रामगृह परिसरात सध्या शुकशुकाट पसरलेला आहे. आदर्श आचारसंहिता असल्यामुळे राजकीय पदाधिकारी किंवा कार्यकर्तेही येथे भटकत नाही. मान्यता नसल्यामुळे सभाच होत नाही तर जायचे कशाला? अशीही खुसफूस ऐकायला मिळत आहे.

साकोली तालुक्यात लाखो रुपये खर्चून विश्रामगृहाची प्रशस्त इमारत बांधकाम करण्यात आले. येथे दोन सुट उपलब्ध आहेत, मात्र अनेक वर्षापासून त्याठिकाणी कर्मचारी नसल्यामुळे विश्रामगृह शोभेची वास्तू ठरत आहे. साकोली तालुक्याच्या सिमेलगत असलेल्या नागझिरा अभयारण्य तसेच पर्यटनाच्या दृष्टीने नवेगावबांध येथे पर्यटकांची नेहमी रेलचेल असते. मात्र येथे कर्मचारी नसल्याचे कारण समोर करुन पर्यटकांचा हिरमोड केला जात आहे.
प्रवेशव्दारावर सूचना फलक
भंडारा सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत एकुण २२ विश्रामगृह व विश्राम भवनाच्या प्रवेशव्दारावर कार्यकारी अभियंता यांच्या आदेशानुसार सुचना फलक लावण्यात आले आहे. या फलकावर १० मार्चपासून लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागु असल्याने जिल्ह्यातील सर्व विश्रामभवन, गृहाचे आरक्षण जिल्हाधिकाºयांच्या परवानगी शिवाय देण्यात येणार नाही. तसेच त्यांच्या परिसरात कोणत्याही प्रकारची राजकीय सभा, बैठक घेण्यास प्रतिबंध असल्याचे नमूद आहे.

Web Title: Lok Sabha Election 2019; Shukushkat in 22 Government Houses of the District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.