लोकमत ‘टॅलेन्ट सर्च’ परीक्षा लवकरच
By Admin | Published: November 30, 2015 12:49 AM2015-11-30T00:49:19+5:302015-11-30T00:49:19+5:30
लोकमत बाल विकास मंचतर्फे ६ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय टॅलेन्ट सर्च परीक्षा (एलटीएसई) आयोजित करण्यात येणार आहे.
भंडारा : लोकमत बाल विकास मंचतर्फे ६ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय टॅलेन्ट सर्च परीक्षा (एलटीएसई) आयोजित करण्यात येणार आहे. कोणत्याही शाळेतील वर्ग ८ ते १० चे विद्यार्थी परीक्षेत नि:शुल्क सहभागी होऊ शकतात.
जिल्हास्तरीय, शालेयस्तरीय व वर्गनिहाय विजेत्यांना भेटवस्तू, बक्षिस देऊन गौरविण्यात येईल. परिक्षा वर्ग ८, ९ व १० करिता घेण्यात येणार असून स्टेट बोर्ड, सी.बी.एस.सी. किंवा आय.सी.एस.ई. बोर्डप्रमाणे नियोजित करण्यात येईल. गणित, विज्ञान, बुद्धीमत्ता चाचणी यावर आधारित ६० प्रश्नांची बहूपर्यायवाची परिक्षा (एमसीक्युएस) राहील. बरोबर उत्तराला ४ गुण तर चुकीच्या उत्तराला १ गुण कमी करण्यात येईल. ओएमआर उत्तर पत्रिकेत काळ्या रंगाचा बॉल पेनने उत्तराच्या वर्तुळाला पूर्णत: भरायचे आहे. विजयी स्पर्धकांना लॅपटॉप, टॅबलेट, सायकल, बॅग, स्कुल बॅग सारखे आकर्षक भेटवस्तू देऊन जिल्हास्तरीय कार्यक्रमात सत्कार करण्यात येईल. परीक्षेचे स्थळ व वेळ लवकरच पुढील बातमीतून कळविण्यात येईल.
तालुकास्तरावर निवडक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी एलटीएसई परीक्षा दिली असल्यास त्यांना परीक्षा देता येणार नाही. परीक्षेच्या अधिक माहितीकरिता जिल्हा संयोजक ९०९६०१७६७७ यांच्याशी संपर्क साधावा. (मंच प्रतिनिधी)