गोसेखुर्दच्या पाण्यासाठी तळमळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 12:58 AM2020-07-20T00:58:14+5:302020-07-20T00:58:50+5:30
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. निसर्गाच्या कुशीत राहून निसर्गाच्या सोबतीने शेती कसणे तारेवरची कसरत होत आहे. खरिपात पावसाने हुलकावणी दिल्याने झालेली रोवणी प्रभावित झाली आहे. ही विदारकता दामाजी खंडाईत यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे ठेवली. सदर समस्या लक्षात घेता त्यांनी दुसºयाच दिवशी गोसेखुर्दच्या अभियंत्यांना पालांदूर परिसरात पाणी पोहोचविण्याचे निर्देश दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : महत्वाकांक्षी गोसेखुर्दचे पाणी पालांदूर व परिसरात कालव्याद्वारे मिळून परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाकरिता लाभ मिळावा, याकरिता दामाजी खंडाईत यांनी लोकप्रतिनिधी यांच्याकडे साकडे घालत गोसेखुर्द सागराचे पाणी पालांदूर शिवारात पोहोचावे, याकरिता तळमळ चालविलेली आहे. ही समस्या सोडविण्याकरिता पालांदूर वासियांची तळमळ सुरू आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे. निसर्गाच्या कुशीत राहून निसर्गाच्या सोबतीने शेती कसणे तारेवरची कसरत होत आहे. खरिपात पावसाने हुलकावणी दिल्याने झालेली रोवणी प्रभावित झाली आहे. ही विदारकता दामाजी खंडाईत यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे ठेवली. सदर समस्या लक्षात घेता त्यांनी दुसºयाच दिवशी गोसेखुर्दच्या अभियंत्यांना पालांदूर परिसरात पाणी पोहोचविण्याचे निर्देश दिले. उपविभागीय अभियता एस. आर.भुरे, सहाय्यक अभियंता पी. एस. शंभरकर, सरपंच पंकज रामटेके, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बारई, राधेश्याम पाथरे, मुखरू बागडे यांनी पालांदूर, कवलेवाडा, मेंगापूर, कवडसी, खैरी, जेवनाळा, मचारना आदींनासोबत घेत प्रत्यक्ष पालांदूर वितरिकाची पाहणी केली. अभियंत्यांनी वास्तवतेची माहिती वरिष्ठांना दिली.
नेरला उपसा सिंचन योजना अंतर्गत पालांदूर वितरिकाचे काम काही ठिकाणी थांबलेले आहे. जमीन संपादन प्रक्रिया अपुरी आहे. पालांदूर वितरका कच्च्या स्वरूपात काही ठिकाणपर्यंत आलेली आहे. मचारणा गावापर्यंत नेरला उपसा सिंचनचे पाणी पोहोचले आहे. त्या ठिकाणापासून तर जेवनाळा तलावापर्यंतचे काम जिल्हा परीषद सदस्य विनायक बुरडे यांनी शेतकऱ्यांच्या मागणीवरून कच्चे खोदकाम केले. त्यामुळे अनेक शेतकºयांना संकटकाळी सिंचनाकरिता लाभ झालेला आहे. काही प्रमाणात पाणी जेवणाळा येथील तलावात सुद्धा पोहोचलेला आहे. जोपर्यंत पक्के कालवे अधिकृतरित्या बांधून होत नाही तोपर्यत पालांदूर येथील परिसरात गोसेचे पाणी पोहोचणे शक्य नसल्याचे समजले. जेवनाळा ,मचारना परिसरात कालव्याच्या पाण्याने रोवणी सुरू झालेली असून शेतकरी आनंदात आहे. मात्र या कालव्याचा अनेक शेतकºयांना अजूनही लाभ मिळालेला नाही.
पालांदूर परिसरातील कामाचे नियोजन अंतिम टप्प्यात आलेल आहे. जून २०२१ पर्यंत पालांदूर, मेंगापूर, कवलेवाडा परिसरात गोसेचे पाणी पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठरले आहे. कोरानाच्या संकटाने पालांदूर परिसरातील बांधकाम थांबले आहे. पालांदूर परिसरात मेंगापूर इथपर्यंत भरत खंडाईत यांच्या शेताच्या जवळपास खुला कालवा राहून पुढे भूमिगत एक मीटर पाइपलाइनच्या आधाराने थेट नाल्यापर्यंतचा भाग सिंचनाखाली नियोजित केलेला आहे. पालांदूर परिसरात सुमारे ५४२ हेक्टरवर सिंचन नियोजित आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने कालव्यांचे व वितरिकाचे काम बंद आहे.
- एस. आर. भुरे, उपविभागीय अभियंता, नेरला उपसा सिंचन योजना.