देशाच्या संरक्षणासाठी तत्पर राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2019 10:05 PM2019-01-03T22:05:23+5:302019-01-03T22:07:09+5:30
विद्यार्थ्यांनी व्यसनाच्या आहारी जावू नये. विद्यार्थी हे देशाची शान आहे. देशाच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने तत्पर असले पाहिजे. त्यासाठी आतापासून मनाची तयारी ठेवा, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विद्यार्थ्यांनी व्यसनाच्या आहारी जावू नये. विद्यार्थी हे देशाची शान आहे. देशाच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने तत्पर असले पाहिजे. त्यासाठी आतापासून मनाची तयारी ठेवा, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी येथे केले.
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेद्वारा संचालित संत शिवराम महाराज विद्यालयाच्या स्नेहसंमेल उद्घाटन सोहळ्यात त्या गुरुवारी बोलत होत्या. त्यांच्याहस्ते स्रेहसंमेलन आणि विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष कैलास बशिने होते. प्रमुख पाहुणे म्हणून भंडारा पंचायत समितीच्या उपसभापती वर्षा साकुरे, वसतीगृहाच्या गृहपाल रजनी वैद्य, कास्ट्राईब संघटनेचे सुर्यभान हुमणे, संस्थेचे उपाध्यक्ष भाऊराव दुधकार, मुख्याध्यापक देवानंद चौधरी, मुख्याध्यापिका कुंदा गोडबोले उपस्थित होते. यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक विनिता साहू म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी स्वयंरक्षीत होण्याची गरज आहे. शालेय परिसरात कुणी आमिष देत असेल, कुणाला फुस लावत असेल तर लगेच आपल्या शिक्षकांना सांगा, कुठे गुन्हा घडत असेल तर किंवा तुम्हाला धोका वाटत असेल तर पोलीस विभागाने प्रतिसाद हा अॅप सुरु केला आहे. तो आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन घ्या. बटन दाबल्याच आपण कुठेही असले तरी लोकेशननुसार आपल्या मदतीला धावून येईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी दहावीच्या परिक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या रुपाली सोनकुसरे, रेणुका ठक्कर, ऐश्वर्या नंदनवार, रितीक चोपकर यांच्यासह हॉकी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणारे उमेश बांते, मुकेश खरब आणि शिष्यवृत्ती परिक्षेतील तेजस कारेमोरे, क्षितीज मोहनकर, साहस मेश्राम, महंत लाडे यांचा सत्कार करण्यात आला. यशस्वीतेसाठी सुरेश गोंधळे, धिरज बांते, रजनी सेलोकर, अश्विनी देशभ्रतार, संजय पडोळे यांनी परिश्रम घेतले. संचालन शेखर बोरकर यांनी केले.