करिअर आॅप्शन म्हणून खेळाकडे बघा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 10:28 PM2017-09-15T22:28:43+5:302017-09-15T22:28:54+5:30
पूर्वी खेळाकडे करिअर आॅप्शन म्हणून बघितले जात नव्हते, परंतु आज खेळाकडे करिअर आॅप्शन म्हणून पाहिले जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पूर्वी खेळाकडे करिअर आॅप्शन म्हणून बघितले जात नव्हते, परंतु आज खेळाकडे करिअर आॅप्शन म्हणून पाहिले जाते. आज क्रीडा क्षेत्रात अनेक अधिकारी व कर्मचाºयांनी राज्य व राष्ट्रीयस्तरावर आपले उत्कृष्ट काम केले आहे. आजच्या सामन्याच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना स्पोर्ट स्टार करणे कठीण नाही. खेळ हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले.
भारतामध्ये फिफा अंडर १७ या होणाºया फुटबॉल स्पर्धेच्या अनुषंगाने महाराष्टÑात मिशन १ मिलीयन कार्यक्रम राबविण्यात येत असून भंडारा जिल्हयात मिशन फुटबॉलचा शुभारंभ छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल येथे शुक्रवारी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, छत्रपती शिवाजी अवार्डी अशोकसिंह राजपूत, शिक्षणाधिकारी बी.एल. थोरात, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष पुनम बावणकर, नितीन तुरस्कर, अॅड. मधुकांत बांडेबुचे, राजेंद्र भांडारकर, शाम देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू म्हणाल्या, प्रत्येक खेळात भारत प्रगती पथावर आहे. खेळाबाबत अनेक माध्यमाद्वारे जागृती करण्यात आली आहे. फुटबॉल खेळासाठी खुप सुविधा पाहिजेच असे नाही. पावसात सुध्दा हा खेळ खेळता येतो. आज आपल्या देशाला फिफा कपचे यजमानपद मिळाले आहे. या बद्दल सर्वांना अभिमान वाटला पाहिजे व त्याबद्दल आपल्या मनात आवड निर्माण झाली पाहिजे. आपल्याला आज उपलब्धी मिळाली आहे.
मिशन फुटबॉलचा शुभारंभ जिल्हा प्रशासन संघ व जिल्हा पत्रकार संघ यांच्यात झालेल्या सामान्याने झाला. या जिल्हा प्रशासन संघ विजयी ठरला.
पुढील सामने क्रिडा विभाग एकादश, पोलीस विभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, अभियंता ग्रृप, स्काऊट गाईड, तसेच जिल्हयातील एकविध जिल्हा क्रिडा संघटनेचे संघ नगर परिषद, जिल्हा सैनिक कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, पतंजली ग्रृप, इतर शासकीय विभागाचे संघ याच्यात होवून जिल्हा क्रीडा संकुल येथे फुटबॉल खेळून व्यायाम व आनंदासाठी फुटबॉल हा संदेश सर्वांनी दिलेला आहे. तसेच जिल्हयातील माध्यमिक व उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी फुटबॉल खेळून अवघा भंडारा जिल्हा फुटबॉलमय केला.