जेवनाळा येथील मालगुजारी तलावाचे रूप पालटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 05:00 AM2020-05-27T05:00:00+5:302020-05-27T05:01:05+5:30
तलावाच्या तोंडावरच मातीचे ढिगारे टाकल्याने पाण्याचा प्रवाह बंद होण्याची पूर्ण शक्यता असल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी लघुपाटबंधारे विभाग यांच्याकडे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होत असल्याचे निवेदनातून कळविले होते. याची दखल घेत तोंडावर असलेले मातीचे ढिगारे सपाटीकरण करून तलावाचे तोो तोंड खुले करण्यात आल्याने पावसाळ्यात येणारे पाणी नक्कीच तलावात जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याने आनंद व्यक्त होत आहे .
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : गाव तलाव अर्थात मामा तलाव शेतकरी व गावकऱ्यांना मोठे वरदान ठरलेले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात या तलावातून कित्येक पशुपक्षी, जनावरे यांची तृष्णा शांत होत पर्यावरण समतोल राखण्यासाठी यांची मोठी मदत झालेली आहे.
लाखनी तालुक्यातील पालांदूर जवळील जेवणाला येथील मामा तलाव विस्तीर्ण जागेत असून सूमारेअडीचशे ते तीनशे एकर खरीपात सिंचन होऊन शेतकऱ्यांना मदत होते. गावातील खाजगी विहिरीला सुद्धा या तलावातून पाझर माध्यमातून अप्रत्यक्षरीत्या मोठी मदत शक्य आहे.
जून २०१८ ला जल शिवार योजनेतून खोली करण्याचे काम हाती घेतले गेले. यातून तलावाच्या तोंडावरच मातीचे ढिगारे टाकल्याने पाण्याचा प्रवाह बंद होण्याची पूर्ण शक्यता असल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी लघुपाटबंधारे विभाग यांच्याकडे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होत असल्याचे निवेदनातून कळविले होते. याची दखल घेत तोंडावर असलेले मातीचे ढिगारे सपाटीकरण करून तलावाचे तोो तोंड खुले करण्यात आल्याने पावसाळ्यात येणारे पाणी नक्कीच तलावात जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याने आनंद व्यक्त होत आहे . जेवढा पाणी तलावात साचेल तेवढी मदत गरजूंना नक्कीच होईल. गाव तलाव गावच्या सौंदयार्चा व श्रीमंतीचा एक अंग असल्याने प्रत्येक गावकºयांनी मामा तलावाची काळजी घेणे नितांत गरजेचे आहे. गावचे सामाजिक कार्यकर्ते नितीन रणदिवे व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मामा तलावाचे अस्तित्व टिकविण्यासाठी वारंवार प्रयत्न करीत मामा तलावाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मे हिट मध्ये सुद्धा आजही तलावात भरपूर पाणी असल्याने तलावाचे अस्तित्व महत्त्व आपोआपच समोर येते आहे.
गाव तलावाच्या विकासासाठी शासनाच्या वतीने दरवर्षी विविध योजनांच्या माध्यमातून खोलीकरण, सौंदर्यीकरण करीत तलावाचे जलशाठ्यात प्रमाण वाढविण्याकरिता प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवसेंदिवस पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती वाढत असता त्याची निगा राखणे व देखभाल-दुरुस्ती वेळेत करणे अत्यावश्यक झाले आहे. पाणी हे जीवन असल्याने गावकऱ्यांनी मामा तलावांना गावाची संपत्ती समजत काळजी घेणे अगत्याचे आहे.
जेवनाळा येथील मामा तलावाच्या पाळीवरील मातीचे ढिगारे दूर झाल्याने तलावात येणाºया पाण्याचा प्रवाह खुला होत तलावाची शान अबाधित राहायला मोठी मदत होईल. शासनासह प्रत्येक गावकºयांनी सुद्धा तलावाच्या अस्तित्वाची व नियोजनााची काळजी घेणे गरजेचे आहे. लघुपाटबंधारे विभाग यांनी दाखविलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो.
-नितीन रणदिवे, सामाजिक कार्यकर्ता जेवनाळा