सेतू केंद्रांवर गावकऱ्यांची लुबाडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2017 12:21 AM2017-01-13T00:21:01+5:302017-01-13T00:21:01+5:30

मोहाडी तालुक्यातील जांब येथील सेतू केंद्रांवर ग्रामस्थांची लुबाडणूक होत असल्याची तक्रार पंचायत समिती सदस्य जगदीश उके यांनी केली आहे.

Looters of the villagers at Setu centers | सेतू केंद्रांवर गावकऱ्यांची लुबाडणूक

सेतू केंद्रांवर गावकऱ्यांची लुबाडणूक

Next

जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : पं.स. सदस्याची मागणी
भंडारा : मोहाडी तालुक्यातील जांब येथील सेतू केंद्रांवर ग्रामस्थांची लुबाडणूक होत असल्याची तक्रार पंचायत समिती सदस्य जगदीश उके यांनी केली आहे. याच आशयाचे निवेदन वरिष्ठांना पाठविण्यात आले आहे.
शासनाच्या धोरणानुसार सन २०११ ला पंतप्रधान घरकुल योजना मिळण्याच्या अनुषंगाने प्रत्येक गावात सर्वे केल्यानंतर लाभार्थ्यांची आॅनलाईन यादी प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये १५ आॅगस्ट २०१६ पुर्वीच प्राप्त झालेली आहे. पंचायत समिती मोहाडी अंतर्गत संपुर्ण गावातील लाभार्थ्यांची बुक यादी तयार झालेली आहे. तरी सुध्दा जांब येथे सुरु असलेले सेतु केंद्र मालक किरण बडवाईक यांनी गावातील राममंदिर मध्ये दहा रुपयांची पावती फाडून जाहिर मुनियादी दिली व प्रत्येक लाभार्थ्यांकडून शंभर रुपये घेवून पंतप्रधान आवास योनजेचे आॅनलाईन अर्ज भरुन दिल्याची तक्रार पंचायत समिती दस्य जगदिश उके यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. शासनाचे कोणतेही आदेश नसतांना गावातील लोकांची फसवणुक झाल्यामुळे जांब येथील सेतु केंद्रावर नियमानुसार कारवाई करुन जनतेला न्याय देण्याची मागणी पंचायत समिती सदस्य जगदिश उके यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Looters of the villagers at Setu centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.