तंटामुक्त समितीच्या साक्षीने प्रेमीयुगल विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 10:26 PM2018-05-18T22:26:43+5:302018-05-18T22:26:43+5:30

घरात अठराविश्व दारिद्र असतांना कुटूंबाला उदरनिर्वाह कसा चालणार, या हेतूने वाहन चालविण्याचा काम करणारा अमित घोडेस्वार व आई-वडील शेतीचा व्यवसाय करीत मुलीला उच्च शिक्षण अर्थात बि कॉम प्रथम वर्षाला असलेली पल्लवी गायधने यांचे दोन वर्षापासून प्रेम संबंध जुळले. परिणामी ठाणा येथील तंटामुक्त गांव समितीने दोघांचे लग्न साधेपणाने लावून दिले.

Love-loving committee witnessed love affair | तंटामुक्त समितीच्या साक्षीने प्रेमीयुगल विवाहबद्ध

तंटामुक्त समितीच्या साक्षीने प्रेमीयुगल विवाहबद्ध

Next
ठळक मुद्देठाणा पेट्रोलपंप येथील घटना : संसारोपयोगी साहित्याचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : घरात अठराविश्व दारिद्र असतांना कुटूंबाला उदरनिर्वाह कसा चालणार, या हेतूने वाहन चालविण्याचा काम करणारा अमित घोडेस्वार व आई-वडील शेतीचा व्यवसाय करीत मुलीला उच्च शिक्षण अर्थात बि कॉम प्रथम वर्षाला असलेली पल्लवी गायधने यांचे दोन वर्षापासून प्रेम संबंध जुळले. परिणामी ठाणा येथील तंटामुक्त गांव समितीने दोघांचे लग्न साधेपणाने लावून दिले.
मुलगी ही चिखली येथील शेतकरी यशवंत गायधने यांची मुलगी पल्लवी (२३) हीचा ठाणा पेट्रोलपंप येथील दिवंगत राजकुमार घोडीस्वार यांचा मुलगा वाहन चालक व दहावीपर्यंत शिक्षण घेतले. अमितशी प्रेमसंबंध झाला. मुलीच्या आई-वडीलांला या लग्नास विरोध होता. मात्र मुलगी लग्नास ठाम असल्याने व दोन्ही म्हणजे पल्लवी व अमित यांचे प्रमाणपत्राचे पडताळणी केले असता, लग्नास काहीच हकरत नसल्याचे जाणविले. पल्लवी व अमित यांच्या अर्जाचा विचार करीत ग्रामपंचायत ठाणा येथील तंटामुक्त सभागृहात साधेपध्दतीने विवाह लावून देण्यात आले. यावेळी, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष जयपाल लांजेवार, समिती सदस्य फरजाना शेख, पंचायत समिती माजी सदस्या अनुसया बांगळकर, उपसरपंच अरविंद तिरपुडे, धम्मशिला मेश्राम, मुलाची आई राजमाता घोडेस्वार, वासनिक, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र किंर्देले, निकेतन चवरे, प्रशांत देशभ्रतार, ग्रामविकास अधिकारी एच.डी. सतदेवे, रतन बोरकर उपस्थित होते.

Web Title: Love-loving committee witnessed love affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.