प्रेमीयुगुल अडकले विवाहबंधनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 12:20 AM2017-09-02T00:20:07+5:302017-09-02T00:20:58+5:30

पे्रम हे प्रेम असते. निरंतर प्रवाहीत झºयाप्रमाणे असते. प्रेम आंधळे असते यात केव्हा आपण गुरफडतो हे कळतच नसते.

Lovers Love Stuck In Marriage | प्रेमीयुगुल अडकले विवाहबंधनात

प्रेमीयुगुल अडकले विवाहबंधनात

Next
ठळक मुद्देग्रामस्थांनी घेतला पुढाकार : आंतरजातीय विवाह सोहळा थाटात

लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : पे्रम हे प्रेम असते. निरंतर प्रवाहीत झºयाप्रमाणे असते. प्रेम आंधळे असते यात केव्हा आपण गुरफडतो हे कळतच नसते. यातूनच प्रेम बरहतो. यात जात पातीचे बंधन अजीबात नसते. नेमके हेच पालांदुरच्या प्रवीण व रोहिणीला लागू आहे. मित्र मंडळीं, आप्तस्वयकीयांच्या सोबतीने भरत खंडाईत यांच्या पुढाकाराने दोघेही विवाहबद्ध झाले.
प्रविण पालांदुरचा तर रोहिनी जवळच्या मेंगापूरची. प्रवीण दहावी शिकून मजूरीचे काम करतो तर रोहिणी महाविद्यालयाची प्रथम वर्षाची विद्यार्थ्यांनी आहे. रोहिणीच्या घराशेजारील बांधकामातून प्रवीणची ओळख झाली. रोहिणीचा भाऊ प्रविणचा मित्र झाला. यातून प्रवीणचे रोहिणीच्या घरी जाणेयेणे वाढले. प्रेमाला चालना मिळाली यात रोहिणीची जात अडचण ठरली नाही. मात्र प्रेमवेलीवर इवलशा पाखराची चाहूल दिसली तेव्हा समाजमन मात्र टिका करायला पुढे आला. कारण रोहिणी अनुसूचित जमातीची व अत्यंत गरीब घरची तर प्रवीण इतर मागासवर्गातला व गावात प्राबल्य जमातीचा असल्याने प्रेमविवाहाला अडचणी आल्या. पण प्रवीण सच्चा प्रेमी असल्याने व रोहिणीच्या वडिलाच्या शब्दाला मान देत प्रकरण भरत खंडाईत यांच्याकडे आले. दोघ्यांच्याही बाजू समजून घेण्यात आल्या. आर्थिक व सामाजिक अडचणी पुढे आल्या. पण भरत खंडाईत यांनी सगळा भार उचलला व पवनीच्या चंडीका मातेच्या मंदिरात थाटात विवाह संपन्न केला. प्रवीण मुखरू भुसारी तर रोहिणी तुळशीराम इनवते यांनी आप्तस्वीकीयांचे आशिर्वाद घेत संसार थाटला.

Web Title: Lovers Love Stuck In Marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.