राज्यस्तरीय राष्ट्रसंत युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 11:28 PM2017-11-12T23:28:59+5:302017-11-12T23:30:29+5:30

श्री गुरुदेव सेवा मंडळ मोहाडीतर्फे आयोजित तिसरे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन माता चौंडेश्वरी मंदिराच्या प्रांगणात रविवारी मोठ्या थाटात पार पडले.

In a loving acchick Inch In Inchul In प्रकारची sometimes In bed ac Comple In In Inch In Inchul In bed, residence, bed In | राज्यस्तरीय राष्ट्रसंत युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन

राज्यस्तरीय राष्ट्रसंत युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन

Next
ठळक मुद्देपरिसंवादाचे आयोजन : गं्रथदिंडीने शहरात आणले चैतन्य

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : श्री गुरुदेव सेवा मंडळ मोहाडीतर्फे आयोजित तिसरे राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युवा साहित्य संमेलनाचे उद्घाटन माता चौंडेश्वरी मंदिराच्या प्रांगणात रविवारी मोठ्या थाटात पार पडले.
पहाटे ५.३० वाजता सामूदायिक प्रार्थना, ध्वजारोहण व ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात करण्यात आली. १०.३० वाजता संमेलनाचे उद्घाटन भूदान यज्ञ मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ वेरुळकर यांच्या हस्ते करण्यात आले. संमेलनाध्यक्ष म्हणून डॉ. प्रा. भास्करराव विघे (मोझरी), स्वागताध्यक्ष गौरीशंकर नागफासे, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सिद्धार्थविनायक काणे, आमदार चरण वाघमारे, तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, मोहाडीच्या नगराध्यक्षा स्वाती निमजे, केशवराव निर्वाण, नामदेव गहाणे, विनायक कावळे यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन सोहळ्याचे संचालन श्रीकृष्ण पखाले यांनी तर उपस्थितांचे आभार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा नलीनी कोरडे यांनी मानले. दुसºया सत्रात महिलांना निर्भय होऊन जगण्याचा मंत्र देण्यासाठी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ.ममता इंगोले अकोला या होत्या. प्रमुख वक्त्या म्हणून डॉ.योगीता पिंजरकर (अकोला), साक्षी पवार (अकोला) यांनी ‘निर्भय हो यह देश की माता, मंगल कीर्ती करा’ने या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन माधुरी राहांगडाले यांनी तर आभार प्रदर्शन जयश्री सातोरकर यांनी केले.

रांगोळ्यांनी सजली मोहाडी
भारतीय संस्कृतीत पाहुण्यांच्या स्वागतासाठी घराच्या प्रवेशद्वारासमोर रांगोळी घातली जाते. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे युवा साहित्य संमेलन असल्याने स्वागतासाठी रांगोळींची श्रृंखला मोहाडीत बघायला मिळाली. सणासारखा दिवस मोहाडीकरांनी अनुभवला. सकाळी चौंडेश्वरी माता मंदिर येथून ग्रंथदिंडी काढण्यात आली. गावातील प्रमुख मार्गाने प्रदक्षिणा घालत ग्रंथदिंडी पुन्हामंदिरात आली. ग्रंथदिंडीत गुरुदेव भक्त, ग्रामवासी, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक तसेच विकास अधिकारी नरेश दिपटे, आशिष पात्रे, प्रेमरतन दम्मानी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Web Title: In a loving acchick Inch In Inchul In प्रकारची sometimes In bed ac Comple In In Inch In Inchul In bed, residence, bed In

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.