देवनारा नदीपात्रातून यंत्राने रेतीचा उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 09:39 PM2018-09-18T21:39:39+5:302018-09-18T21:40:18+5:30
अवैध व नियमबाह्य रेतीचा उपसा व वाहतूक होऊ नये म्हणून महसूल प्रशासनाने अतिशय कडक नियम तयार केले, परंतु कर्तव्याअभावी रेती कंत्राटदारांचे चांगभले सुरू असून तुमसर तालुक्यातील देवनारा नदीपात्रात जेसीबीने सर्रास रेतीचे उत्खनन सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : अवैध व नियमबाह्य रेतीचा उपसा व वाहतूक होऊ नये म्हणून महसूल प्रशासनाने अतिशय कडक नियम तयार केले, परंतु कर्तव्याअभावी रेती कंत्राटदारांचे चांगभले सुरू असून तुमसर तालुक्यातील देवनारा नदीपात्रात जेसीबीने सर्रास रेतीचे उत्खनन सुरू आहे. नदी पात्रात जेसीबीने ट्रकमध्ये रेती भरली जात आहे. बावनथडी नदीपात्र खड्डेमय बनले आहे. कुणाच्या आशिर्वादाने नियमबाह्य कामे सुरू असल्याचा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
तुमसर मुख्यालयापासून ४५ कि़मी. अंतरावर आदिवासी बहुल गाव देवनारा आहे. देवनारा गावाजवळून बावनथडी नदी वाहते. महसूल प्रशासन सदर रेतीघाट लिलाव केला. मध्यप्रदेशाची सीमा येथे प्रारंभ होते. अगदी कमी ब्रास रेतीचा लिलाव करण्यात आला होता. देवनारा व चिखली येथील ग्रामस्थांनी रेती तस्करीची तक्रार केली आहे. देवनारा नदीपात्रात जेसीबी घालून रेतीचा उपसा सर्रास सुरू आहे. नदी पात्रात सरळ ट्रक नेले जातात. जेसीबीने रेती ट्रकमध्ये भरली जाते. नियमबाह्य रेतीचा उपसा करतानी ग्रामस्थांनी व्हीडीओ चित्रीकरण केले. त्याची माहिती महसूल प्रशासनाला दिली, परंतु संबंधितावर अद्याप कारवाई झाली नाही.
नदीपात्रात यंत्र घत्तलता येत नाही. रेतीचे उत्खनन करता येत नाही. ११ सप्टेंबर रोजी जीव धोक्यात घालून ग्रामस्थांनी चित्रीकरण केले. लोकमत प्रतिनिधीला चित्रिकरण व फोटो पाठविल्या या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे देण्यात आली.
तुमसर येथे उपविभागीय अधिकाऱ्याचे कार्यालय आहे. नियमानुसार कामे केली जातात असे कार्यालयाकडून नेहमी सांगितले जाते. महसूल प्रशासनाचे तलाठी, मंडळ अधिकारी गावात आहेत. यंत्राने रेती उत्खनन करतानी अधिकाºयांना दिसत नाही. ग्रामस्थांना मात्र दिसत आहे. हा संशोधनाचा विषय आहे. पर्यावरणाला येथे निश्चितच धोका निर्माण झाला आहे.
बावनथडी नदी खड्डेमय झाली आहे. मध्यप्रदेशाची सीमा नदीपात्राच्या मध्यभागातून सुरू होते. मध्यप्रदेशातून रेतीचा उपसा झाला असे सांगण्यात येत आहे. रेती व्यवसाय करणारे व ग्रामस्थ यांच्यात संघर्षाची शक्यता नाकारता ये त नाही. महसूल प्रशासनाने येथे दखल घेऊन कारवाईची गरज आहे. संबंधितावर कारवाईची मागणी माजी पंचायत समिती सदस्य प्रमा पेंदाम, सुभाष धुर्वे, रोशन सावतवाल, मनोहर निनावे, ललन शुक्ला यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
कारवाईसाठी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची गरज
नगदी पैसा, बेरोजगारी व स्वत:चा दबदबा यामुळे तुमसर तालुक्यातील असामाजिक तत्वांनी रेती व्यवसायाकडे धाव घेतल्याची माहिती आहे. महसूल विभाग येथे कारवाई करीता हतबल दिसत आहे. पोलीस संरक्षणात कडक कारवाईची गरज आहे. केवळ नियम तयार करून काहीच फायदा नाही. प्रत्यक्ष कारवाई करिता वरिष्ठ अधिकाºयांच्या रूपात सिंघम अधिकाºयाची गरज आहे.