भंडारा जिल्ह्यात मधुकर कुकडे यांना रेल्वे पोलिसांकडून धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 12:18 PM2020-01-17T12:18:14+5:302020-01-17T12:34:07+5:30

भंडारा येथील तुमसर रोड रेल्वेस्थानकावर शुक्रवारी सकाळी ९.३० च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार मधुकर कुकडे यांना रेल्वे पोलिसांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडली.

Madhukar Kukde in Bhandara district was beaten by the railway police | भंडारा जिल्ह्यात मधुकर कुकडे यांना रेल्वे पोलिसांकडून धक्काबुक्की

भंडारा जिल्ह्यात मधुकर कुकडे यांना रेल्वे पोलिसांकडून धक्काबुक्की

Next
ठळक मुद्देमुलभूत सोयींच्या मागण्यांचे निवेदन द्यायला आले होते

मोहन भोयर
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा: येथील  तुमसर रोड  रेल्वेस्थानकावर शुक्रवारी सकाळी ९.३० च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार मधुकर कुकडे यांना रेल्वे पोलिसांनी धक्काबुक्की केल्याची घटना घडली. यावेळी उपस्थित असलेले आमदार राजू कारेमोरे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी सकाळी  तुमसर रोड   रेल्वेस्थानकावर स्टेशन निरीक्षक गौतम बॅनर्जी हे निरीक्षणासाठी आले होते.  रेल्वे स्थानकावर मुलभूत सोयी उपलब्ध करून दिल्या जाव्यात, अशा आशयाचे निवेदन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार मधुकर कुकडे आपल्या कार्यकर्त्यांसह त्यांच्या भेटीला आले. मात्र रेल्वे पोलिसांनी त्यांना आतमध्ये जाण्यास मज्जाव केला व धक्काबुक्की करत मागे सारले. या घटनेच्या वेळी उपस्थित असलेले आमदार राजू कारेमोरे यांनी रेल्वे पोलिसांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनाही पोलिस बधले नाहीत. पोलिस व कार्यकर्ते यांच्यादरम्यान शाब्दिक चकमकही उडाली. यामुळे येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी भंडारा जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सीमा भुरे यांनी स्थानिक रेल्वे अधिक्षकांना कुकडे यांच्या भेटीची कल्पना दिली होती. मात्र बॅनर्जी यांचा दौरा कार्यालयीन असून त्यात राजकारणाचा संबंध नाही असे उत्तर त्यांना मिळाले होते. अखेरीस बॅनर्जी यांची दोन मिनिटे भेट घेऊन या प्रकरणावर पडदा पडला.

Web Title: Madhukar Kukde in Bhandara district was beaten by the railway police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे