मध्यप्रदेशातील तरुणीवर चुल्हाडात अत्याचार; दोन आरोपी अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 01:57 PM2023-04-15T13:57:56+5:302023-04-15T13:58:50+5:30

नोकरीच्या आमिषाला तरुणी पडली बळी

Madhya Pradesh girl assaulted in Chulhad of bhandara dist; Two accused arrested | मध्यप्रदेशातील तरुणीवर चुल्हाडात अत्याचार; दोन आरोपी अटकेत

मध्यप्रदेशातील तरुणीवर चुल्हाडात अत्याचार; दोन आरोपी अटकेत

googlenewsNext

रणजित चिंचखेडे 

चुल्हाड (सिहोरा) (भंडारा) : रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून मध्यप्रदेशातील एका तरुणीवर दोन नराधमांनी चुल्हाड गावात अत्याचार केल्याची संतापजनक घटना महिनाभरानंतर प्रकाशात आली आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून सिहोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन तरुणांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

मुशरान जाहिद खान (२२, गौसनगर, जि. बालाघाट, मध्य प्रदेश) आणि रोहित कमल भोयर (२३, कोरनी, जि. गोंदिया) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित तरुणी मध्यप्रदेशातील बालाघाट येथील मोती गार्डनमध्ये जानेवारी महिन्यात एकटी बसली असता या तरुणांनी रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमीष दाखविले. तरुणीने होकार दिल्यानंतर मोबाईल क्रमांक आरोपीनी घेतला असता संपर्कात आले.

१० मार्चला तिचा पेपर पेपर संपल्यावर आरोपींनी फिरायला जायाचे सांगून गोंदिया शहरात नेले. तेथून चुल्हाड गावात आणले. गावातील एका खोलीवर नेऊन दोन्ही तरुणांनी बळजबरीने अत्याचार केले. यानंतर रोहितने पीडितेच्या डोक्यावर कुंकू लावले. त्यानंतर पीडितेला उडीसा राज्यातील रेंगाडी गावात नेले. इकडे आई वडील मुलीच्या शोधात असताना ती उडीसा राज्यातील रेंगाडी गावात असल्याची माहिती मिळाली.

आई वडीलांनी ते गाव गाठल्यावर पिडीतेने आई वडिलांना संपूर्ण हकीकत सांगितली. यावरून सिहोरा पोलिसात तक्रार दाखल करून कलम ३७६ (ड), ३७६ (२) (एन) ५०७ भादंविने गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींना ताब्यात घेतल्यावर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना १८ एप्रिलपर्यंत चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

Web Title: Madhya Pradesh girl assaulted in Chulhad of bhandara dist; Two accused arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.