मग्रारोहयोतून होणार मत्स्यसंवर्धन तळी

By admin | Published: April 20, 2015 12:41 AM2015-04-20T00:41:44+5:302015-04-20T00:41:44+5:30

भंडारा जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळख आहे. जिल्ह्यात मासेमारीचा व्यवसाय असून शासनाची योग्य धोरण ..

Magaroharogi will be a fishery pond | मग्रारोहयोतून होणार मत्स्यसंवर्धन तळी

मग्रारोहयोतून होणार मत्स्यसंवर्धन तळी

Next

येणार सुगीचे दिवस : सहा तालुक्यांची प्रायोगिक तत्त्वावर निवड
विलास बन्सोड उसर्रा
भंडारा जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळख आहे. जिल्ह्यात मासेमारीचा व्यवसाय असून शासनाची योग्य धोरण मासेमारीला मिळत नसल्याने मत्स्य उद्योगाला अखेरची घरघर लागली आहे. पण शासनाने नुकतेच शासकीय परिपत्रक काढून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून भंडारा जिल्ह्यातील मत्स्य व्यवसाय वाढीसाठी संवर्धन तळी बांधकाम करणेबाबत पत्रक काढल असून आता जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला सुगीचे दिवस येणार आहेत.
मोहाडी तालुक्यातील नागठाणा येथे मत्स्य संवर्धन तळी होणार असून या भागातील मासेमारी व्यवसायात वाढ होणार आहे. आयुक्त नरेगा नागपूर यांचे संदर्भीय पत्रानुसार भंडारा जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर सन २०१५-१६ मध्ये मत्स्य व्यवसाय वाढीसाठी मत्स्य संवर्धन तळी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत घेण्यात मान्यता दिली आहे.
जिल्ह्यातील मत्स्यसंवर्धन तळी बांधकामासाठी खालील तालुक्यातील गावाचे बांधकाम प्रस्तावित आहेत त्यात मोहाडी तालुक्यातील नागठाणा, तुमसर तालुक्यातील आदर्श सांसद ग्राम गर्रा बघेडा व चांदपूर, पवनी तालुक्यातील पवनी, साकोली तालुक्यातील वलमाझरी, लाखनी तालुक्यातील परसोडी, लाखांदूर तालुक्यातील बारव्हा, भंडारा निरंक यांचा समावेश मत्स्यसंवर्धन तळी बांधकामासाठी आहे.
संवर्धन तळी प्रायोगीक तत्वावर असून खालील अटीचे अधिन राहून परवानगी देण्यात आलेली आहे. त्यात संवर्धन तळी खोदकाम ग्राम पंचायत मार्फत मनरेगा अंतर्गत अनुज्ञेय कामासंदर्भात शासन परिपत्रक ९ आॅक्टोबर २०१२ मधील सार्वजनिक ठिकाणी मत्स्य व्यवसायाकरिता अंदाजपत्रकामध्ये १०० मीटर, ५० मीटर १.५० मीटर आकाराचे बांधकामाचा समावेश करण्यात यावा, दुसरे असे की उपरोक्त कार्यक्रम राबविताना मनरेगाच्या प्रचलित नियम व धोरणाचे पालन करावे व सदर पथदर्शी कार्यक्रमाचा मासिक प्रगती अहवाल वेळोवेळी कार्यालयाला सादर करावा असे नमूद करण्यात आले आहे.
मोहाडी तालुक्यातील नागठाणा येथे मत्स्यसंवर्धन तळीचे बांधकाम लवकरच घेण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित विभाग तयारीला लागले आहे.

नागठाणा येथे मग्रारोहयोतून मत्स्यसंवर्धन तळी घेतल्याने व त्या कामाचे काही दिवसात भूमिपूजन होणार आहे. या प्रकल्पामुळे मत्स्य व्यवसाय करणारे बांधवाचे जीवनमान उंचवणार आहेत.
- एस. ई. कडव,
सहायक कार्यक्रम अधिकारी,
रोहयो पंचायत समिती, मोहाडी.

Web Title: Magaroharogi will be a fishery pond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.