सिलेगाव रस्त्यावर मगरीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 11:29 PM2017-10-12T23:29:45+5:302017-10-12T23:30:34+5:30
तुमसर तालुक्यातील सिलेगाव गाव शिवारातील रस्त्यावर मगर दिसल्याने एकच खळबळ उडाली. मगरीला पुलावरून सरपटत जातांना अनेकांनी पाहिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर तालुक्यातील सिलेगाव गाव शिवारातील रस्त्यावर मगर दिसल्याने एकच खळबळ उडाली. मगरीला पुलावरून सरपटत जातांना अनेकांनी पाहिले. ट्रक लाईटच्या उजेडात ती दिसली. त्यानंतर ती नाल्यात शिरली. परिसरात मगरीचे कधीच दर्शन झाले नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून येत आहे.
सिलेगाव-वाहनी-मांडवी रस्त्यावर नाला आहे. नाला तुडूंब भरून वाहत आहे. बुधवारी रात्री ७.३० ते ८ वाजताच्या सुमारास ट्रक लाईटच्या प्रकाशात मगर सरपटताना दिसली. प्रथम चालकाला विश्वास बसला नाही.
ट्रक जवळ नेऊन बिघतल्यावर त्याला मगरीचे दर्शन झाले. या रस्त्यावर येणारे - जाणारे वाहनधारकही थांबले. कुतूहल व भीतीने त्यांनी मगरीचे दर्शन घेतले.
रस्त्यावर गर्दी झाली. आरडाओरड झाल्याने ती नाल्यात शिरली.
या परिसरात यापूर्वी कधीच मगर बघितली नसल्याचे तुमसर पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपुरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या नाल्यामधून सिंचनासाठी पाणी घेतले जाते, परिणामी शेतकºयांनी अशावेळी सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे.