मॅग्नीजचे ट्रक पोलीस ठाण्यात जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 11:25 PM2017-09-10T23:25:37+5:302017-09-10T23:26:52+5:30

Magnesia truck deposited in police station | मॅग्नीजचे ट्रक पोलीस ठाण्यात जमा

मॅग्नीजचे ट्रक पोलीस ठाण्यात जमा

Next
ठळक मुद्देक्षमतेपेक्षा जास्त भार : बोनकट्टा सीमेवर भोपाळ येथील सीबीआईचे पथक तैनात

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : जबलपूर येथून मॅग्नीज ओरची खडी घेऊन सनफलॅग कारखान्यात जाणाºया दोन ट्रकवर खापा चौकात थांबवून कारवाईकरिता तुमसर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. क्षमतेपेक्षा जास्त माल ट्रकमध्ये आहे. वरिष्ठ अधिकाºयांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. अशी माहिती आहे. कंत्राटदारात वर्चस्वाची लढाई या मार्गावर सुरु आहे. मध्यप्रदेशातील बोनकट्टा सीमेवर भोपाळ येथील विशेष सीबीआईचे पथक रविवारी तैणात करण्यात आल्याची माहिती आहे.
पोलाद तथा स्टील कारखान्याकरिता जबलपूर परिसरातून मोठ्या प्रमाणात मॅग्नीज ओरची खडी नेण्यात येते. सनफलॅग आयर्न अ‍ॅण्ड स्टील कारखान्यात जबलपूर येथून एम एच ४० एके ९५०९ व एम एच ४० ए. के. ६००९ दोन ट्रक क्षमतेपेक्षा जास्त खडी नेतांनी खापा चौकात ते थांबविण्यात आले.
तपासणी केल्यानंतर त्यांना तुमसर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. ४५ टनाची क्षमता असलेल्या ट्रकमध्ये सुमारे ६० ते ७० टन मॅग्नीज ओरची खडी आहे.
रविवारी ट्रकचे मालक तुमसर पोलीस ठाण्यात दुपारी २ वाजता दाखल झाले होते. त्यांनी कंत्राटदारात वर्चस्वाची लढाई सुरुअसून त्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाºयांच्या निर्देशानंतर ट्रकवर कारवाई सुरु असल्याचे बोलून दाखविले. या मार्गावर सर्वच ट्रक क्षमतेपेक्षा जास्त माल वाहून नेत आहेत. आमच्याच ट्रकवर कारवाई केली जात आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान मध्यप्रदेशाच्या सिमेत महाराष्टÑ सीमेजवळ भोपाल येथील विशेष सीबीआईचे तपासणी पथकाने डेटा घातला आहे.
महाराष्टÑात जाणाºया प्रतयेक ट्रकची ते तपासणी करीत असल्याची माहिती आहे. राजकीय वरदहस्तावर कारवाई सुरु झाल्याची माहिती आहे. येथे कंत्राटदारात युद्ध भडकण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून महाराष्टÑातील ट्रक चालकानीही राजकीय वजन वापरण्यारिता कंबर कसली आहे. दोन राज्यातील मॅग्नीज ओर व्यावसायिकांत येणाºया पुढील काळात जुंपण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकाºयांकडून कारवाई करणारे व्यावसायीक वजनदार असल्याची माहिती आहे.

Web Title: Magnesia truck deposited in police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.