मॅग्निजने भरलेले वाहन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 09:51 PM2018-07-13T21:51:49+5:302018-07-13T21:52:15+5:30

नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अंतर्गत सीतासावंगी बीटमधील कक्ष क्रमांक ६५ राखीव वनात बुधवारी सकाळी ७.३० च्या सुमारास गस्ती दरम्यान मॅग्निज भरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. या परिसरात चिखला मॉईन प्रसिद्ध मॅग्नीज खान असून ठिकठिकाणी मॅग्नीज निदर्शनास येत असल्यामुळे मॅग्नीज चोरटे सक्रीय आहेत. यावर वनविभागाचे गस्ती पथक नेहमी सतर्कता दाखवून मॅग्नीज चोरट्यावर आळा घालतात.

Magnizen filled the vehicle seized | मॅग्निजने भरलेले वाहन जप्त

मॅग्निजने भरलेले वाहन जप्त

Next
ठळक मुद्देसीतासावंगी येथील घटना : आरोपी अद्याप सापडले नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनारा : नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अंतर्गत सीतासावंगी बीटमधील कक्ष क्रमांक ६५ राखीव वनात बुधवारी सकाळी ७.३० च्या सुमारास गस्ती दरम्यान मॅग्निज भरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.
या परिसरात चिखला मॉईन प्रसिद्ध मॅग्नीज खान असून ठिकठिकाणी मॅग्नीज निदर्शनास येत असल्यामुळे मॅग्नीज चोरटे सक्रीय आहेत. यावर वनविभागाचे गस्ती पथक नेहमी सतर्कता दाखवून मॅग्नीज चोरट्यावर आळा घालतात.
शुक्रवारी सकाळी ७.३० च्या सुमारास वन कर्मचारी गस्तीवर आल्याची मॅग्नीज चोरट्याला भनक लागताच मॅग्नीज भरलेली मारूती व्हॅन क्रमांक (एमएच ३९ सीएन ७०६) रामबहादूर गोरखा यांच्या झोपडीजवळ सोडून चोरटै पसार झाले. यामध्ये मॉईलचे अधिकारी व सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वन कर्मचाºयाला मदत केली असून घटनेचा पंचनामा करून मॅग्नीज भरलेली व्हॅन ताब्यात घेतली. यावेळी नाकाडोंगरीचे वनपरिक्षेत्र धिकारी नितेश धनविजय, क्षेत्र सहायक एस.पी. दिघोरे, बीटरक्षक के.एन. मस्के, मॉईल सुरक्षा निरीक्षक एस.वाय. मुदलियार उपस्थित होते. तपास वनपरिक्षेत्राधिकारी धनविजय यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
चोरटे पसार
वन कर्मचारी गस्तीवर आल्याची मॅग्नीज चोरट्याला भनक लागताच मॅग्नीज भरलेली मारूती व्हॅन रामबहादूर गोरखा यांच्या झोपडीजवळ सोडून चोरटै पसार झाले. घटनेचा पंचनामा करून मॅग्नीज भरलेली व्हॅन ताब्यात घेतली.

Web Title: Magnizen filled the vehicle seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.