पेंचच्या पाण्याकरिता महापंचायत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 12:25 AM2017-10-07T00:25:35+5:302017-10-07T00:27:33+5:30
पेंच प्रकल्पाचे लाभ क्षेत्रातील धान पिकाला पाणी त्वरित उपलब्ध करुन दयावे. कृषी पंपाना २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा. पेंच प्रकल्पाचे स्थानांतरीत कार्यालय पुर्ववत भंडारा जिल्ह्यात सुरु करावे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शहापूर : पेंच प्रकल्पाचे लाभ क्षेत्रातील धान पिकाला पाणी त्वरित उपलब्ध करुन दयावे. कृषी पंपाना २४ तास वीजपुरवठा करण्यात यावा. पेंच प्रकल्पाचे स्थानांतरीत कार्यालय पुर्ववत भंडारा जिल्ह्यात सुरु करावे. तसेच टाकळी येथे २०१३ मध्ये प्रस्तावित उपसा सिंचन योजनेचे काम सुरु करण्यात यावे. याकरिता आज शहापूर येथे शेतकरी संघर्ष समितीतर्फे शेतकरी महापंचायत सभेचे आयोजन स्थानिक श्री संत ज्ञानेश्वर सभागृहात करण्यात आले होते.
शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात आयोजित महापंचायत सभेला शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय रेहपाडे, युवा सेना जिल्हाध्यक्ष मुकेश थोटे, तालुका प्रमुख अनिल गायधने, अॅड. रवी वाढई, पं.स. उपसभापती ललित बोंद्रे, विभाग प्रमुख जयंत बुधे, प्रकाश पारधी, विलास लिचडे, राधेश्याम बांगडकर, यशवंत वंजारी उपस्थित होते.
शेतकºयांना मार्गदर्शन करताना नरेंद्र भोंडेकर म्हणाले की, एका पाण्यासाठी धान पिक धोक्यात आले असताना प्रकल्पाचे पाणी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला असून जोपर्यंत धान पिकाला पेंच प्रकल्पाचे पाणी मिळणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. वेळ पडल्यास तीव्र आंदोलन करु शेतकºयांनी एकजुटीने लढा दयावा, असेही ते म्हणाले. यावेळी उपस्थित शेतकºयांचे मनोगत जाणुन घेण्यात आले. पेंचचे पाणी दया, शेतकरी वाचवा असे आवाहन ही करण्यात आले.
तत्पूर्वी पेंच पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांशी आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात चर्चा करण्यात येवून त्यांना निवेदन देण्यात आले.
त्यानंतर सभा घेण्यात आली. दुपारी ४ वाजतापर्यंतचा अल्टिमेटम अधिकाºयांना देण्यात आला. सभा संपल्यानंतर पेंच पाटबंधारे उपविभाग भंडारा यांच्याकडून लिखित आश्वासन मिळाल्यानंतर पुढील आंदोलन स्थगित करण्यात आले.
सभेचे प्रास्ताविक संजय रेहपाडे व संचालन अभय बन्सोड यांनी केले. सभेला प्रभु हटवार, बाळा वाघमारे, नरेश लांजेवार, संजय आकरे, सुनिल सोमनाथे यांच्यासह शेतकरी संघर्ष समितीचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.