Maharashtra Election 2019 ; विकासाच्या नावावर मतदान करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 06:00 AM2019-10-20T06:00:00+5:302019-10-20T06:00:46+5:30

शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी लाखांदूर तालुक्यातील विविध गावांमध्ये धुवाधार प्रचारसभा पार पडल्या. यावेळी डॉ.फुके बोलत होते. ते म्हणाले, काही उमेदवार केवळ दिशाभूल करण्याचे काम करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वगुणांमुळेच राज्य प्रगतीपथावर जात आहे. तीन वर्षात अनेक कोटींची कामे खेचून आणली.

Maharashtra Election 2019 ; Vote in the name of development | Maharashtra Election 2019 ; विकासाच्या नावावर मतदान करा

Maharashtra Election 2019 ; विकासाच्या नावावर मतदान करा

Next
ठळक मुद्देपरिणय फुके : शेवटच्या दिवशी लाखांदूर येथे शक्तिप्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : रोजगार आणि परिसराचा सर्वांगिण विकास हेच माझे प्रथम ध्येय आहे. मात्र दिशाभूल करणारेही कमी नाहीत. अन्य मुद्यांच्या आधारे मतांचा जोगवा उमेदवार मागत असतात. मात्र त्या भागात विकास कामे केली नाहीत. परिणामी मतदारांनी केवळ विकासाच्या नावावर मतदान करावे आणि दिशाभूल करणाऱ्यांपासून सावध राहावे असे आवाहन साकोली विधानसभा क्षेत्राचे भाजप - शिवसेना महायुतीचे उमेदवार परिणय फुके यांनी केले.
शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी लाखांदूर तालुक्यातील विविध गावांमध्ये धुवाधार प्रचारसभा पार पडल्या. यावेळी डॉ.फुके बोलत होते. ते म्हणाले, काही उमेदवार केवळ दिशाभूल करण्याचे काम करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वगुणांमुळेच राज्य प्रगतीपथावर जात आहे. तीन वर्षात अनेक कोटींची कामे खेचून आणली. बराच मोठ्या प्रमाणात जनकल्याणकारी उपाययोजना लागू करण्यात आल्या. पोलीस पाटील, पटवाऱ्यांचे प्रलंबित मानधन प्रकरण निकाली काढले. आदिवासी गोवारी समाजातील जातीचे वैधता प्रमाणपत्राचा प्रश्न निकाली काढला. मच्छीमार सोसायटीला दिलासा देत तलावाचा पट्टा माफ करण्यात आला. भाजपनेच धानाची मुल्य वाढवत १३५० वरून २३०० रुपयापर्यंत नेली. भाजपने दिलेले वचन पूर्ण केले आहे. भाजप सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर शेतकºयांना बोनस आणि १२ तास वीज पुरवठा देण्यात येईल असेही ते म्हणाले. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यामध्येही माझे सातत्याने कार्य सुरु आहे असेही ते म्हणाले. लाखांदूर तालुक्यातील मासळ, बेलाटी, बेलसूर, तई, भागडी या गावात झालेल्या प्रचारसभेत नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदविला.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Vote in the name of development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.