Maharashtra Election 2019 : भटक्या विमुक्त समाजाला विकासाच्या प्रवाहात आणणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:49 AM2019-10-15T00:49:04+5:302019-10-15T00:49:47+5:30
गत ४० वर्षापासून नाथजोगी समाजावर अन्याय होत आहे. हा समाज अनेकवर्ष पालात राहत होता. मागील सरकारने ६० वर्षात या समाजाच्या विकासासाठी काही केले नाही. या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणाºया नेत्याने २७ वर्ष कोदामेढीच्या नाथजोगी समाजाला न्याय मिळवून दिला नाही, असे त्यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या भटक्या विमुक्त समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण प्रयत्न करू. कोदामेढी येथील नाथजोगी समाजाला न्याय मिळवून देवू, असे प्रतिपादन साकोली मतदारसंघाचे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांनी केले.
लाखांदूर तालुक्यात प्रचार दौऱ्यादरम्यान कोदामेढी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ते नाथजोगी वाडीत पोहचले. त्याठिकाणी समाज बांधवांशी आपुलकीने संवाद साधला. नाथजोगी समाजाला न्याय, वनजमिनीचा मार्ग मोकळा करून पट्ट्यांचा मालकी हक्क देण्यासोबत घरकुल योजनेचा लाभ मिळवून देणार असल्याचे असे डॉ. फुके यांनी सांगितले.
गत ४० वर्षापासून नाथजोगी समाजावर अन्याय होत आहे. हा समाज अनेकवर्ष पालात राहत होता. मागील सरकारने ६० वर्षात या समाजाच्या विकासासाठी काही केले नाही. या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणाºया नेत्याने २७ वर्ष कोदामेढीच्या नाथजोगी समाजाला न्याय मिळवून दिला नाही, असे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार बाळा काशीवार, श्याम झिंगरे, जिल्हा परिषद सदस्य माधुरी हुकरे, अॅड. वसंत एंचिलवार, नूतन कांबळे, नरेश खरकाटे, डॉ. नंदुरकर, विनोद ठाकरे, वामन बेदरे, सुनील भोवते, सीताराम चोपकर यांच्यासह नाथजोगी समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदिवासी नेते धर्मराज भलावी भाजपमध्ये
राष्ट्रीय आदिवासी पिपल्स फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष धर्मराज भलावी यांनी साकोली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. परिणय फुके यांच्या कार्याने प्रभावित होऊन भाजपमध्ये प्रवेश घेतला. साकोली येथील प्रकाशपर्व निवासस्थानी त्यांनी प्रवेश घेतला. त्यावेळी डॉ. परिणय फुके यांनी त्यांचे स्वागत केले. भलावी हे आदिवासी जंगल कामगार संघाचे अध्यक्ष असून खांबा जांबळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच आहेत.