महाराष्ट्र वीज भारनियमन मुक्तच आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:59 AM2018-11-30T00:59:12+5:302018-11-30T00:59:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : सध्या राज्यात शेतकºयांना आठ तास आणि ग्राहकांना २४ तास वीज पुरवठा केला जात आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सध्या राज्यात शेतकºयांना आठ तास आणि ग्राहकांना २४ तास वीज पुरवठा केला जात आहे. शेतकºयांना आठ तास वीज पुरेशी असून त्यापेक्षा अधिक वीज दिली तर भुगर्भातील पाण्याचा प्रचंड उपसा होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य भारनियमन मुक्तच आहे, असे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सुत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
गत चार वर्षात ऊर्जा विभागाने केलेल्या विकास कामाचा आढावा घेत त्यांनी शासनाचा विविध योजनांची माहिती दिली. ते म्हणाले, भारनियमन होत असल्याची ओरड सर्वत्र आहे. परंतु शेतकºयांना आठ तास आणि ग्राहकांना २४ तास वीज देण्याचा नियम आहे. त्यापेक्षा कमी वीज दिली तर भारनियमन म्हणता येईल. सध्या शेतकºयांना रात्री वीज दिली जाते. त्यामुळे त्यांच्यापुढे विविध समस्या आहेत. दिवशी वीज पुरवठा कशा केला जाईल, यावर उपाययोजना सुरु असून अटल सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून दिवसा वीज देण्याचा प्रयत्न केला जाईल असे त्यांनी सांगितले. वीज वितरण कंपनीने सेंट्रलाईज बिलींग सिस्टम आणली असून २ कोटी २५ लाख ग्राहक तंत्रज्ञानाचा वापर करतात. तर १ कोटी ४० लाख ग्राहक मोबाईलशी जोडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात तंत्रज्ञानाचा वापर वाढविला जाणार असून ग्राहकांना ई-मेलवरच बिल पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे वीज वितरणचे प्रत्येक बिलामागे दहा रुपये वाचतिल. त्याचा अप्रत्यक्ष फायदा ग्राहकांनाच होणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रात प्रत्येक गावात व घरात वीज पोहचविली जात असून गडचिरोली व नंदूरबार जिल्हा वगळताच सर्वच गावात वीज पोहचल्याचा दावा त्यांनी केला. वीजेचे अपघात टाळण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जात असून ५० वर्षावरील कर्मचाºयांच्या मदतीला हेल्पर देण्यात आले आहे. तसेच लवकरच २३ हजार ग्रामविद्युत सेवक नियुक्त केले जातील असेही पाठक यांनी सांगितले.
जिल्ह्यात वीज दुरुस्ती कामांसाठी ४६ कोटी
वीज वितरण कंपनीचे गावागावत असलेले खांब वाकले आहेत. तार लोंबकळत आहेत. त्यामुळे अपघाताची भीती वाढली आहे. या कामांच्या दुरुस्तीसाठी भंडारा जिल्ह्यात ४६ कोटी रुपये मंजूर आहे. अलीकडेच ११ कोटी ५० लाख रुपयांचे टेंडर काढण्यात आले असून वर्षभरात ही कामे पुर्ण होतील असे विश्वास पाठक यांनी सांगितले.