साकोली तालुक्याने केले महाराष्ट्राचे नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 10:45 PM2018-08-25T22:45:06+5:302018-08-25T22:45:34+5:30
साकोली तालुक्यातील एकोडी येथील लोककला मंचाने पांडेचेरी येथे आयोजीत लोककला महोत्सवात राज्याचे नेतृत्व केले. यात लावणी, पोवाडा, गोंधळ, लोककला उत्कृष्टपणे सादर करण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
एकोडी/साकोली : साकोली तालुक्यातील एकोडी येथील लोककला मंचाने पांडेचेरी येथे आयोजीत लोककला महोत्सवात राज्याचे नेतृत्व केले. यात लावणी, पोवाडा, गोंधळ, लोककला उत्कृष्टपणे सादर करण्यात आल्या.
समृद्ध लोककलांचा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. महाराष्ट्राच्या लोककलांमधून उभी राहते ती महाराष्ट्राची लोकसंस्कृती. बोलीभाषेत नैतिकतेची मूल्ये समाजात रूजविणारी लोककला म्हणजे एक स्वतंत्र लोकविद्यापीठ आहे. महाराष्ट्राच्या प्रभावी लोककलांमध्ये प्रामुख्याने कीर्तन, भारूड, गोंधळ, तमाशा, गण, गौळण, पोवाडा, दंडार, लावणी या लोककलांचा समावेश होतो. ग्रामीण भागातून आजही विविध समाजगट ही संपन्नता जोपासत आहेत.
यावेळी समीर दंडारे यांच्या नेतृत्वात भवेश कोटांगले, संदीप कोटांगले, गुड्डू बोरकर, प्रज्ञाशिल मेश्राम, अनुराधा मेश्राम, अर्चना कान्हेकर, कीर्ती मानकर, अनुराधा कांबळे, नितू ब्राम्हणकर, उषा मुर्खे, दिपाली भराडे, रुपाली राऊत, आशिका साठे या संचाने विविध लोककला उत्कृष्टपणे सादर केली. या कामगिरीबद्दल तालुक्यात त्यांचे कौतूक केले जात आहे.