भंडारा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत
By गोपालकृष्ण मांडवकर | Published: April 19, 2024 10:21 AM2024-04-19T10:21:47+5:302024-04-19T10:22:27+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: भंडारा जिल्ह्यात सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. किरकोळ अपवाद वगळता पुढे अनुचित घटना घडल्याचे नोंद नाही.
भंडारा - जिल्ह्यात सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. किरकोळ अपवाद वगळता पुढे अनुचित घटना घडल्याचे नोंद नाही.
सकाळपासूनच उन्हाची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातही सकाळीच मतदानासाठी गर्दी उसळलेली पाहण्यात आली. पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या तरुणांचा उत्साह पाहण्यासारखा होता. भंडारा शहरालगत शेवटच्या टोकावर असलेल्या शहीद भगतसिंग वार्ड टाकळी येथील मतदान केंद्रावर सकाळपासूनच रांगा लागलेल्या होत्या. सुजाता रहाटे, सेजल भोपे, समीर उरकुडे या नव मतदारांनी येऊन पहिल्यांदाच येथे मतदानाचा हक्क बजावला.
मद्यपींची पोलिसांसोबत बचाबाची
या मतदान केंद्राबाहेर एका मद्यपी तरुणाने पोलिसांसोबत बाचाबाची केली. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
....
भंडारा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत