कुणाला द्यायचा पाठिंबा? कार्यकर्त्यांकडून मतदान, भंडाऱ्यातील माजी आमदाराचा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 09:43 AM2024-04-06T09:43:46+5:302024-04-06T09:44:19+5:30

Maharashtra Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्या उमेदवाराची पाठराखण करायची याचा निर्णय घेण्यासाठी माजी आमदार चरण वाघमारे यांनी जन विकास फाउंडेशनमधील आपल्या कार्यकर्त्यांचे चक्क मतदान घेतले.

Maharashtra Lok Sabha Election 2024: Who to support? Voting by workers, former MLA's fund in Bhandara | कुणाला द्यायचा पाठिंबा? कार्यकर्त्यांकडून मतदान, भंडाऱ्यातील माजी आमदाराचा फंडा

कुणाला द्यायचा पाठिंबा? कार्यकर्त्यांकडून मतदान, भंडाऱ्यातील माजी आमदाराचा फंडा

 भंडारा - लोकसभेच्या निवडणुकीत कोणत्या उमेदवाराची पाठराखण करायची याचा निर्णय घेण्यासाठी माजी आमदार चरण वाघमारे यांनी जन विकास फाउंडेशनमधील आपल्या कार्यकर्त्यांचे चक्क मतदान घेतले. या मतदानाची मोजणी १० एप्रिलला करून त्यानंतर निवडणुकीत काय भूमिका घ्यायची हे ते जाहीर करणार आहेत. 

वाघमारे यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, ऐनवेळी डॉ. प्रशांत पडोळे यांना पक्षाने उमेदवारी दिल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. पुढील काही दिवस कोणत्याही पक्षांच्या मंचावर जाणार नाही, रॅलीत अथवा प्रचाराला जाणार नाही, असे त्यांनी जाहीर केले होते. आपल्या जन विकास फाउंडेशनमधील कार्यकर्त्यांनाही त्यांनी हे आवाहन केले होते.

परंतु, लोकसभा निवडणुकीत स्वस्थ बसण्याऐवजी आपली राजकीय भूमिका घेण्यासंदर्भात कार्यकर्त्यांकडून सातत्याने  विचारणा होत असल्याने त्यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यानंतर कोणत्या पक्षाला सहकार्य करायचे याबाबत कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडून मतदान करून घेण्यात आले. 

मतदानावर काेअर कमिटी घेणार निर्णय 
- जनविकास फाउंडेशनमधील २० प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक कोअर कमिटी वाघमारे यांनी तयार केली आहे. 
- कार्यकर्त्यांच्या मतदानाच्या निकालावर व त्यांच्याकडून आलेल्या कौलावर विचार करून १० तारखेला फाउंडेशनची पुढील भूमिका जाहीर केली जाणार आहे.

Web Title: Maharashtra Lok Sabha Election 2024: Who to support? Voting by workers, former MLA's fund in Bhandara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.