महर्षीचा केतन वैद्य जिल्ह्यात अव्वल
By Admin | Published: May 29, 2016 12:35 AM2016-05-29T00:35:01+5:302016-05-29T00:35:01+5:30
‘सीबीएसई’च्या (सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन) दहावीचा परीक्षेचा निकाल शनिवारी दुपारी आॅनलाईन घोषित करण्यात आला.
निकाल सीबीएसईचा : जिल्ह्यातून ९४२ विद्यार्थी उत्तीर्ण, हर्षदा आंबीलढुके द्वितीय
भंडारा : ‘सीबीएसई’च्या (सेंट्रल बोर्ड आॅफ सेकंडरी एज्युकेशन) दहावीचा परीक्षेचा निकाल शनिवारी दुपारी आॅनलाईन घोषित करण्यात आला. यामध्ये महर्षी विद्या मंदिर भंडाराचा विद्याथी केतन प्रशांत वैद्य हा जिल्ह्यातून प्रथम आला आहे. त्याला ९८.८० टक्के गुण मिळाले असून त्याची सीजीपीए रॅकिंग १० आहे. याच विद्यालयाची हर्षदा शेषराव आंबीलढुके ही जिल्ह्यातून द्वितीय आली. तिला ९८.६ टक्के गुण मिळले आहेत. जिल्ह्याचा निकाल ९५.९२ टक्के लागला. जिल्ह्यात ‘सीबीएसई’ पॅटर्नच्या दहावीच्या १० शाळा असून त्यात महर्षी विद्या मंदिर भंडारा, केंद्रीय विद्यालय जवाहरनगर, सेंट पिटर बेला, रॉयल पब्लिक स्कूल भंडारा, सनफ्लॅग विद्यालय, शिरीन नेत्रावाला तुमसर, महर्षी विद्या मंदिर तुमसर, एसओएस खोकरला, स्प्रिंग डेल भंडाराचा समावेश आहे. या शाळांमधून एकूण ९८२ विद्यार्थ्यांपैकी ९४२ विद्यार्थी उर्तीर्ण झाले. महर्षी विद्या मंदिर व सेंट पिटर्स शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. सेंट पिटरचे १०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या विद्यालयातून शुभम एकापुरे (९८.४) प्रथम तर आर्यन पाटील द्वितीय आला. रॉयल पब्लिक शाळेतून मानसी थोटे प्रथम (९६.४) तर प्रिंसी मेश्राम (९३.८) ही द्वितीय आली आहे. (प्रतिनिधी)