महाशिवरात्र २०२४: एसटीला पावणार भोलेशंकर! शिवतिर्थांवरील यात्रांसाठी १२१ बसेसचे नियोजन

By युवराज गोमास | Published: March 5, 2024 08:37 PM2024-03-05T20:37:36+5:302024-03-05T20:38:52+5:30

गतवर्षी २७,३७१ यात्रेकरूंच्या प्रवासातून एसटीने कमविले ९.२० लाख

Mahashivratri 2024 St Bus management special Planning of 121 buses for yatras to Shiv pilgrims | महाशिवरात्र २०२४: एसटीला पावणार भोलेशंकर! शिवतिर्थांवरील यात्रांसाठी १२१ बसेसचे नियोजन

महाशिवरात्र २०२४: एसटीला पावणार भोलेशंकर! शिवतिर्थांवरील यात्रांसाठी १२१ बसेसचे नियोजन

युवराज गोमासे, भंडारा: लोकवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटी महामंडळाने यंदा महाशिवरात्री यात्रानिमित्ताने गायमुख, प्रतापगड, आंभोरा व लाखापाटील येथे जाणाऱ्या भाविकांसाठी १२१ विशेष बस गाड्यांचे नियोजन केले आहे. गतवर्षी ११४ बसेस यात्रेकरूंच्या सेवेत होत्या. २७ हजार ३७१ यात्रेकरूंच्या माध्यमातून एसटीने ९ लाख २० हजार ७५९ रूपयांची कमाई केली होती. यंदा वाढीव बसांच्या नियोजनामुळे शिवतिर्थांवर जाणाऱ्या भाविकांसह एसटीला भोलेनाथ पावणार, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

भंडारा जिल्ह्यात अनेक शिवतिर्थांवर महाशिवरात्रीनिमित्त यात्रांचे व विविध कार्यक्रमांचे आयोजन पार पडतात. परंतु, गायमुख, आंभोरा, कोका अभयारण्यातील लाखा पाटील व गोंदिया जिल्ह्यातील प्रतापगड येथील यात्रा विशेष प्रसिद्ध आहेत. लाखो भाविक येथील यात्रेत सहभागी होतात. सध्या शहरांसह ग्रामीण भागातील शिवभक्तांचे पोहे विविध साधनांनी मार्गस्थ झाले आहे. ८ मार्चला महाशिवरात्रीला गंतव्यस्थळी पोहचण्याची धडपड भाविकांत आहे. मात्र, ज्यांचेकडे साधन नाहीत, ते एक दिवसाची यात्रा करण्यासाठी एसटीला पसंती देत असतात.

सन २०२३ मध्ये एसटी महामंडळाने गायमुख, प्रतापगड, आंभोरा व लाखापाटील येथील शिवतिर्थांवर जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधांसाठी ११४ बसांचे नियोजन केले होते. चारही शिवतिर्थांवर एकूण १९ हजार ४५३ किमीचा प्रवास एसटीने केला. सुमारे २७ हजार ३७१ यात्रेकरूंनी प्रवास केल्याने एसटीला ९ लाख २० हजार ७५९ रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. एसटीला सर्वाधिक उत्पन्न गायमुख यात्रेतून मिळाले. त्यानंतरचा क्रम प्रतापगड यात्रेचा होता.
बॉक्स

यंदा २११ बसेस धावणार शिवतिर्थांकडे

यावर्षी महाशिवरात्री यात्रेतून एसटी महामंडळाला अधिक उत्पन्न मिळविण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे यंदा गतवर्षीपेक्षा अधिक म्हणजे १२१ बसांचे नियोजन करण्यात आले आहे. गायमुख यात्रेसाठी ५८, प्रतापगड ५७, आंभोरा ५ तर लाखापाटील यात्रेसाठी एका बसचे नियोजन करण्यात आले आहे.

गतवर्षी मिळालेले उत्पन्न व प्रवासी संख्या

गतवर्षी गायमुख यात्रेसाठी ५३ बसेसमधून १४,६१३ प्रवाशांनी केला. यातून सुमारे ४ लाख ४८ हजार १७९ रूपयांचे उत्पन्न मिळाले. प्रतापगड यात्रेसाठी ५३ बसेसमधून ११,०८५ प्रवाशांनी प्रवास केला. यामधून ४ लाख ६ हजार २३० रूपयांची कमाई झाली. आंभोरा यात्रेसाठी ७ बसेस धावल्या, १,४७७ यात्रेकरूंनी प्रवास केला. यातून ६१ हजार ७१५ रूपयांचे उत्पन्न मिळाले. लाखापाटील यात्रेसाठी एका धावली, १९३ यात्रेकरूंनी प्रवास केला. ४ हजार ६३५ रूपयांची कमाई झाली.

महाशिवरात्रीच्या चार यात्रांसाठी महामंडळाचेवतीने २११ विशेष बसांची सुविधा उपलब्ध होणार आहे. भाविकांनी सुरक्षित प्रवाशासाठी नेहमीप्रमाणे एसटीला प्राधान्य द्यावे.
-तनुजा अहिरकर, विभागीय नियत्रक, भंडारा.

Web Title: Mahashivratri 2024 St Bus management special Planning of 121 buses for yatras to Shiv pilgrims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.