चांदपूर जलाशयाचा मुख्य दरवाजा लिकेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:24 AM2021-07-04T04:24:13+5:302021-07-04T04:24:13+5:30

चुल्हाड (सिहोरा) : चांदपूर जलाशयाचा मुख्य दरवाजा लिकेज झाल्याने यंदा खरिपाचे पाणीवाटप अडचणीत येणार आहे. जलाशयात पाण्याची साठवणूक करता ...

Main gate leakage of Chandpur reservoir | चांदपूर जलाशयाचा मुख्य दरवाजा लिकेज

चांदपूर जलाशयाचा मुख्य दरवाजा लिकेज

Next

चुल्हाड (सिहोरा) : चांदपूर जलाशयाचा मुख्य दरवाजा लिकेज झाल्याने यंदा खरिपाचे पाणीवाटप अडचणीत येणार आहे. जलाशयात पाण्याची साठवणूक करता येत नसल्याने सोंड्याटोला सिंचन योजनेच्या पाणी उपशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लिकेज दरवाजा दुरुस्तीचे काम पाटबंधारे विभागाच्या अभियांत्रिकी विभागाकडे येत असून गोताखोरांच्या मदतीशिवाय दरवाजा दुरुस्ती करता येत नाही. अशी माहिती मिळाली असून लोकमतने या गंभीर समस्येकडे वर्षभरापूर्वी लक्ष वेधले होते. मात्र दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे खरीप हंगामात पाणीवाटपाचे नियोजन विस्कटणार आहे.

जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांत बावणथडी नदी पात्रातून सोंड्याटोला सिंचन योजना पाण्याचा उपसा करीत आहे. या पाण्याची साठवणूक चांदपूर जलाशयात करण्यात येत आहे. चांदपूर जलाशय ओव्हरफ्लो झाल्यानंतर सिंचन प्रकल्पात पाण्याचा उपसा थांबविण्यात येत आहे. या तीन महिन्यांच्या कालावधीत प्रकल्पस्थळात ६० ते ७० लाखांचे वीज बिलाचे देयक आहे. परंतु यंदा चांदपूर जलाशयात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने प्रकल्पस्थळात पाण्याचा उपसा करावा की नाही, यासाठी पाटबंधारे विभागाची गोची झाली आहे. उन्हाळी धान पिकांच्या लागवडीसाठी पाणीवाटप करताना चांदपूर जलाशयाचा मुख्य दरवाजा लिकेज झाला आहे. या दरवाजातून निरंतर पाण्याचा विसर्ग होत आहे. टाकीत पाण्याची धोकादायक साठवणूक झाल्यानंतर टाकीतील पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे खरेदीचे महागडे पाणी नदी, नाल्यात जात आहे. जलाशयाचा मुख्य दरवाजा लिकेज असल्याने यंदा सोंड्याटोला सिंचन योजनेचा पाणी उपसा अडचणीत येणार आहे. जलाशयात दरवाजा लिकेज असल्याने पाणी साठवणूक करता येत नाही. दरम्यान, मुख्य दरवाजा लिकेज असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करून शासनाचे लक्ष वेधले होते. उन्हाळी धान पिकांच्या पाणीवाटपात दरवाजा लिकेज असल्याने सिमेंटच्या पोत्या लादून पाणी अडविण्यात आले होते. ३६ फूट पाणी साठवणूक क्षमता जलाशयाची आहे. हा दरवाजा तुटण्याची शक्यता आहे. जलाशयाचा चिकार धोकादायक झाला असल्याने काही गावांना धोका असल्याचे वर्तविण्यात येत आहे. चिकार दुरुस्तीवरून पाटबंधारे विभागाची यंत्रणा गंभीर असली तरी निधीची वानवा असल्याने विकासकामे थांबली आहेत. निधीकरिता लोकप्रतिनिधींनी आवाज बुलंद करण्याची गरज आहे.

कोट

अभियांत्रिकी विभागाला दरवाजा दुरुस्तीकरिता माहिती देण्यात आली आहे. गोताखोरांच्या मदतीशिवाय शक्य नाही. जलाशयात पाणी असून लवकरच उपाययोजना करण्यात येतील.

- गंगाधर हटवार, शाखा अभियंता, सिहोरा

Web Title: Main gate leakage of Chandpur reservoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.