मुख्य रस्त्याचे सिमेंटीकरण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2017 11:17 PM2017-09-24T23:17:55+5:302017-09-24T23:18:08+5:30
म्हाडा कॉलनी येथील मुख्य रस्ता हा खड्डेमय झाला आहे. यामुळे रस्त्यावरून आवागमन करताना त्रास सहन करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : म्हाडा कॉलनी येथील मुख्य रस्ता हा खड्डेमय झाला आहे. यामुळे रस्त्यावरून आवागमन करताना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे सिमेंटीकरण करावे, अशी मागणी नगरसेविका जयश्री बोरकर यांच्या नेतृत्वात नगराध्यक्ष सुनिल मेंढे व मुख्याधिकारी यांना निवेदनातून करण्यात आली.
निवेदनात म्हाडा कॉलनी येथील मुख्य रस्ता (खात रोड ते ब्रास सिटी अॅकेडमीपर्यंत) हा खड्डेमय झालेला आहे. या रस्त्यावर खूप रहदारी असून पायदळ जाणेही शक्य नाही. येथून वाहनाने जाणे म्हणजे अपघाताला आमंत्रण देण्यासारखे आहे. येथील नागरिकांना या मुख्य रस्त्यावरून नेहमी जाणे येणे करावे लागते. कित्येकवेळा नगरसेविका जयश्री बोरकर नगरिकांनी पालिकेला निवेदन दिले. मात्र नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी म्हाडा कॉलनीच्या विकासासंदर्भात उदासीनता दाखविली आहे. सर्व म्हाडा कॉलनी येथील निवासी हे नगरपालिकेला नियमितपणे टॅक्स भरतात. तरी सुद्धा या मुख्य रस्त्याकडे त्यांनी कधीच लक्ष दिले नाही. त्यामुळे मुख्य म्हाडा कॉलनीच्या रस्त्याचे सिमेंटीकरण करावे, अन्यथा येथील रहिवाशी व नगरसेविका यांच्या नेतृत्वात मोठे आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनातून दिला आहे.
यावेळी नगरसेवक शमीम शेख, नगरसेवक जाबीर मालाधरी, सचिन घनमारे, सुदीप शहारे, अखिल तिवाडे, श्रीकांत पडोळे, सुलोचना रंगारी, वंदना नागदेवे, रिना हटवार, द्वारका कापसे, आशा तिवाडे, वर्षा पाटील, मोना तिवारी, सुशिला चौधरी, विद्या घारगडे, मनिषा पडोळे, रेखा आदमने, मुक्ता तिवाडे, मनिषा मते, ममता खांडेकर, सुनिता शेंडे, विद्या मस्के, लता हटवार, चंद्रकला गायधने, सीमा लांजेवार, छाया भेंडारकर, अनिता माळवी, गीता राखडे, माधुरी पारधी, आदींची उपस्थिती होती.