लाच घेताना मुख्य लिपिकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2017 12:18 AM2017-06-18T00:18:59+5:302017-06-18T00:18:59+5:30
टीसी देण्यासाठी ८५० रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी महाविद्यालयातील मुख्य लिपिकाला आज रंगेहाथ पकडण्यात आले.
कोंढा येथील घटना : एसीबीची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : टीसी देण्यासाठी ८५० रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी महाविद्यालयातील मुख्य लिपिकाला आज रंगेहाथ पकडण्यात आले. शालिकराम ऊकरे असे या लिपिकाचे नाव असून तो कोंढा कोसरा येथील डॉ. अरुण मोटघरे महाविद्यालयात मुख्य लिपीक आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
तक्रारदार हा कोंढा कोसरा येथील रहिवासी असून सन १०-११ मध्ये सदर महाविद्यालयातून शिक्षण घेत होता. दरम्यान त्यांना कॉलेज सोडल्याचा दाखला (टी.सी.) पाहिजे होती. यासाठी मुख्य लिपीक शालिकराम ऊकरे यांनी टीसी देण्यासाठी तक्रारदाराकडे ९५० रूपयांची मागणी केली.
लाच देण्याची इच्छा नसल्याने याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली. दरम्यान आज तडजोडीनंतर ८५० रूपयांची लाच स्वीकारताना ऊकरे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.