आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:33 AM2021-03-08T04:33:18+5:302021-03-08T04:33:18+5:30

आरोग्यसेवा अति महत्त्वाची सेवा आहे. शासनाने आरोग्य विभागातील विविध पदांवर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यासाठी एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस, युनानी,तसेच बीएससी ...

Maintain contract staff in the health department | आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा

आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा

Next

आरोग्यसेवा अति महत्त्वाची सेवा आहे. शासनाने आरोग्य विभागातील विविध पदांवर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यासाठी एमबीबीएस, बीएएमएस, बीएचएमएस, युनानी,तसेच बीएससी नर्सिंग, डीएमएलटी, एएनएम, जीएनएम यासारख्या समकक्ष पदवीधारण करणाऱ्या उमेदवारांची रीतसर लेखी ,तोंडी परीक्षा घेऊन सदर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका,परिचारिका ,मदतनीस, टेक्निशियन तंत्रज्ञ यासारख्या समकक्ष पदांवर कंत्राटी पद्धतीने मानधन तत्त्वावर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नियुक्ती दिनांकापासून आरोग्य सेवेत कार्यरत असलेले कंत्राटी अधिकारी, कर्मचारी विहित कालावधीत कर्तव्य बजावत आहेत. परंतु सदर कर्मचाऱ्यांना कंत्राटी पद्धतीने अल्प प्रमाणात मानधन मिळत आहे. त्यामुळे महागाईचे काळात त्यांना महिन्याचे पंधरा दिवसही सुख-समाधानाने काढता येत नाही. कर्ज व उसनवारीची परतफेड कशी करावी, मुलांचे शिक्षण लग्न कसे करावे, दैनंदिन व्यवहार व कुटुंबाचा सांभाळ कसा करावा आणि वीतभर पोटाची खळगी कशी भरावी आदी प्रश्न त्यांचे समोर आवासून उभे ठाकले आहेत.

निवेदनावर भीमशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देशपांडे, एस. के. वैद्य, बाळकृष्ण शेंडे, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, अंबादास नागदेवे हरिदास बोरकर, अरुण ठवरे, धनराज तिरपुडे, नरेंद्र कांबळे जयपाल रामटेके, सुरेश गेडाम, सुभाष शेंडे, श्री. खोब्रागडे, सुधाकर चव्हाण, मच्छिंद्र टेंभूर्णे, उमाकांत काणेकर, यशवंत घरडे, मोरेश्वर लेधारे, शांताराम खोब्रागडे, फाल्गुन वंजारी, रूपा मेश्राम, दामोधर उके, नत्थु सूर्यवंशी, नंदू वाघमारे, तोताराम दहीवले, महादेव देशपांडे, शैलेश धारगावे, दामोधर गोडबोले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Maintain contract staff in the health department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.