युवा आणि महिलांच्या सहकार्याने गावात शाश्वत स्वच्छता ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:36 AM2021-09-19T04:36:08+5:302021-09-19T04:36:08+5:30
स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायत माडगी येथे तालुकास्तरीय शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी ...
स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायत माडगी येथे तालुकास्तरीय शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी सरपंच गौरीशंकर पंचबुद्धे, उपसरपंच संजय अठराये, कृषी अधिकारी वंजारी, विस्तार अधिकारी महंत, घटारे, डोंगरे, नरेगाचे स्थापत्य अभियंता चौधरी, सहायक अधिकारी कोटांगले, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम गभने, जयसिंग शेलकर, पोलीस कर्मचारी खराबे, सचिव डी. बी. गायधने, मुख्याध्यापक भगत, शिक्षिका भुते, माहिती शिक्षण व संवाद सल्लागार राजेश येरणे, ग्रामपंचायत सदस्य गगनसिंग ठाकूर, सदस्या भुवनेश्वरी नागपुरे, गटसंसाधन केंद्राच्या पल्लवी तिडके, शशिकांत घोडीचोर, हर्षाली ढोके, महिला बचत गटाच्या माधुरी मोहतुरे, प्रतिभा कांबळे, ज्योती हिंगे, माया शेंडे, स्मिता मेश्राम, पूजा मते, आशा तुमसरे, इंदू नागदवे, उषा आगासे, शारदा वहिले, स्नेहा बावने आदींची उपस्थिती होती.
यावेळी कृषी अधिकारी वंजारी यांनी स्वच्छतेसोबतच प्लास्टिकने गावात समस्या निर्माण होते. प्लास्टिकमुळे वसुंधरेचे नुकसान, वातावरणाचा ऱ्हास आणि पर्यावरण प्रदूषित होत आहे. सिंगल युज प्लास्टिक बंदीचा ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन त्याची अंमलबजावणी करावी. सोबतच महिला बचत गटांनी प्लास्टिककडे आर्थिक स्रोत उपलब्ध करण्याची संधी म्हणून पाहण्याची गरज असल्याचे सांगितले. यासोबतच घर, शाळा, सार्वजनिक स्थळे आणि गाव स्वच्छ ठेवून शाश्वत स्वच्छता निर्माण करण्यासाठी युवा वर्ग आणि महिलांच्या सहकार्याने अमृत महोत्सव विविध कार्यक्रमाने साजरा करावा, असेही आवाहन केले. सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रार्थना मंदिरात सर्व अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, महिला बचतगट व नागरिकांची छोटेखानी बैठक घेऊन त्यात अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. त्यांनतर गुरुदेव प्रार्थना घेऊन गावात स्वच्छता श्रमदान राबविण्यात आले. ग्रामपंचायत परिसर, गुरुदेव प्रार्थना मंदिर परिसर, मुख्य चौक, त्यानंतर हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची स्वच्छता, तसेच नदी काठावरील हनुमान मंदिरात स्वच्छता श्रमदान करण्यात आले.
बॉक्स
तुमसर तालुक्यात अंमलबजवणी करा
गटविकास अधिकारी धीरज पाटील यांचे मार्गदर्शनात तालुक्यात ग्रामपंचायत स्तरावर अमृत महोत्सवाला सुरुवात केली आहे. विविध उपक्रमांसाठी नियोजन करून माडगी येथे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी जाऊन स्वच्छता, श्रमदानाचा संदेश दिला आहे. अभियानात सर्व विभागांनी सहभागी होऊन अभियानाची यशस्वी अंमलबजावणी करावी. कोविड नियमांचे पालन करून ग्रामपंचायतस्तरावर सरपंच, सचिव, ग्रामविकास अधिकारी यांनी योग्य तऱ्हेने अमृत महोत्सवाची अंमलबजावणी करावी, तसेच गावात शाश्वत स्वच्छता निर्माण करावी, असे आवाहन गटविकास अधिकारी धीरज पाटील यांनी केले आहे.