मैत्रेय बौध्द विहाराचा स्थापना दिवस
By admin | Published: January 31, 2015 11:15 PM2015-01-31T23:15:07+5:302015-01-31T23:15:07+5:30
येथील नाशिक नगरच्या मैत्रेय बौध्द विहाराचा २० वा स्थापना दिवस आणि भारतीय राज्यघटना दिवस नुकताच अनेक कार्यक्रम आयोजित करुन साजरा करण्यात आला. यात मोटार सायकलची मिरवणूक,
भंडारा : येथील नाशिक नगरच्या मैत्रेय बौध्द विहाराचा २० वा स्थापना दिवस आणि भारतीय राज्यघटना दिवस नुकताच अनेक कार्यक्रम आयोजित करुन साजरा करण्यात आला. यात मोटार सायकलची मिरवणूक, रोगनिदान शिबिर आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
येथील मैत्रेय बौध्द विहारातून मोटारसायकल रॅली काढल्या गेली. ती शहराच्या मुख्य रस्त्यापासून जिल्हाधिकारी चौक, खामतलाव चौक, वैशाली नगर, शास्त्री चौक, असा मार्ग घेऊ न विहारात पोहचली. या रॅलीमध्ये पुरुष महिला, तरुण तरुणी व ज्येष्ठ नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले. भारतीय तिरंगा ध्वज व निळा ध्वज हातात घेवून उपासक व उपासिका बाबासाहेबांचा जयघोष करित होते. दुपारी १२ वाजता रोगनिदान शिबिर कार्यक्रम घेण्यात आला. त्यात दंतचिकित्सक स्वप्नील धारगावे यांनी रुग्णाची तपासणी केली. सायंकाळी ५ वाजता तथागत गौतम बौध्द यांचा मुर्तीची रॅली काढण्यात आली ती नाशिक नगर व शास्त्री चौक येथून फिरुन विहारात समाप्त झाली. सायंकाळी ६.३० वाजता बुध्द वंदना घेण्यात आली. यानंतर व्याख्यानमाला घेण्यात आली. यात बौध्द व आंबेडकर विचारक मंगेश दहिवले, डॉ. संजय वाणे, नगरसेवक विनयमोहन पशिने, सिध्दार्थ चौधरी, व सुनिल भालाधरे यांचे व्याख्यान झाले. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जिवनात कठिण प्रसंगाचा सामना करुन आपल्या बुध्दी कौशल्याने भारतीय राज्यघटना निर्माण केली, असे दहिवले यांनी सांगितले. ते म्हणाले भारतीय राज्यघटना सर्वांत श्रेष्ठ आहे. डॉ. संजय वाणे यांनी बाबासाहेब आंबेडकर हे समाजशास्त्र, राजशास्त्र व अर्थशास्त्र यात पारंगत होते. त्यांनी इतिहासातील अनेक घटनांना उजाळा देत आपल्या भाषणात बाबासाहेबांच्या व्यक्तीत्वाचा परिचय करुन दिला. यावेळी महिलांनी स्वच्छता अभियान राबविले. यावेळी तिसऱ्या वर्गात शिकत असणाऱ्या प्रेक्षा नागदेवे हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषण दिले. प्रशांत रामटेके व मधुरा गजभिये यांनी गीत प्रस्तुत केले. संचालन प्रशांत देशभ्रतार व आभार भूपेश शेंडे यांनी केले. कार्यक्रमाला विजय सावध, प्रमोद नागदेवे, अनिल पाटील, अंजिरा नागदेवे, सारिका गजभिये, नीलिमा गजभिये, मनीषा बोरकर, उज्ज्वला चिचखेडे, अण्णा बागडे, शालिनी भालाधरे, हर्षा मेश्राम, नीलम नागदेवे, सोनम नागदेवे, श्वेता लांजेवार, सचिता लांजेवार आणि नागरिक उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)