जीएसटी कायद्याविषयी जनजागृती करा

By admin | Published: October 2, 2016 12:31 AM2016-10-02T00:31:56+5:302016-10-02T00:31:56+5:30

अप्रत्यक्ष कर पध्दतीत अमुलाग्र बदल करुन अप्रत्यक्ष करांऐवजी एकत्रित वस्तु व सेवा कर कायदा पुढील आर्थिक वषार्पासून आणण्याचा शासनाचा मानस आहे.

Make awareness about GST law | जीएसटी कायद्याविषयी जनजागृती करा

जीएसटी कायद्याविषयी जनजागृती करा

Next

नाना पटोले यांचे आवाहन : विक्रीकर दिन उत्साहात साजरा
भंडारा : अप्रत्यक्ष कर पध्दतीत अमुलाग्र बदल करुन अप्रत्यक्ष करांऐवजी एकत्रित वस्तु व सेवा कर कायदा पुढील आर्थिक वषार्पासून आणण्याचा शासनाचा मानस आहे. या करामुळे विविध करांचा भार कमी होऊन एकच कर लादल्यामुळे वस्तु व सेवांचे दर कमी होण्यासाठी मदत होईल. त्यामुळे जीएसटी कायदा सर्वांसाठी फायदेशीर ठरणारा आहे. त्यामुळे या कायद्याची जगजागृती व्हावी, असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले.
विक्रीकर कार्यालयाच्यावतीने शनिवारला आयोजित विक्रीकर दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार रामचंद्र अवसरे, आमदार बाळा काशिवार, सहाय्यक विक्रीकर आयुक्त प्रविण निनावे, जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले, १९३८ मध्ये महाराष्ट्रात विक्रीकराची सुरुवात झाली. १९३९ मध्ये मुंबई विक्रीकर कायदा पारीत होऊन विक्रीकरास कायदेशीर अधिष्ठान प्राप्त झाले. त्यानंतर राज्याच्या औद्योगिक व आर्थिक प्रगतीबरोबर विक्रीकर प्रणालीमध्ये स्थित्यंतरे आली. वाढत्या औद्योगिक, वाणिज्यीक देवाण घेवाणीमुळे विक्रीकर कायद्यात अनेक बदल होत क्लिष्टता निर्माण झाली होती. त्यामुळे २००५ मध्ये विक्रीकर प्रणालीत आमूलाग्र बदल होऊन व्यापारी व उद्योजकांना सोयीची मूल्यवर्धित कर म्हणजेच व्हॅट प्रणाली अस्तित्वात आली. स्वयंनिर्धारणेवर आधारित हीप्रणाली अद्याप सुरु आहे.
महाराष्ट्र राज्याच्या महसूलात ६५ टक्के वाटा विक्रीकर विभागाचा आहे. राज्यात मागील वर्षी सन २०१५-१६ मध्ये विक्रीकर विभागाव्दारे ७४ हजार ६१६ कोटी रुपये विक्रीकराच्या माध्यमातून महसूली उत्पन्न मिळाला. या महसूली उत्पन्नाचा देशाच्या व राज्याच्या आर्थिक विकासासाठी उपयोग केला जातो. या महसूलातून योजना राबविल्या जातात. विक्रीकराचा मुदतीत भरणा करणाऱ्या साईराज आॅटोमोबाईल्स भंडारा, मारोती काँक्रीड प्राडक्टस भंडारा व जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाचा सत्कार करण्यात आला. 
यावेळी आमदार अवसरे व आमदार काशिवार यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी नागपूर विभागाच्या पाच जिल्ह्यातून विक्रीकर अधिकारी या पदांमध्ये भंडारा विक्रीकर कार्यालयाचे विक्रीकर अधिकारी संदिप डहाके यांचा उत्कृष्ट अधिकारी म्हणून प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रस्ताविक सहाय्यक विक्रीकर आयुक्त प्रविण निनावे यांनी केले. संचालन व्यवसायकर अधिकारी किरण दहिकर यांनी तर आभार सिमा शेळके यांनी मानले. यावेळी विक्रीकर अधिकारी संदिप डहाके, विभागीय सदस्य राजेश राऊत, विक्रीकर अधिकारी गोपाल बावणे, सुशांत नेरकर, प्रशांत पोजगे, विक्रीकर निरिक्षक राजेश राऊत, चंद्रकांत गिऱ्हेपुंजे, अश्विनी बोदेले, राकेश मते, निरज शहारे व कर्मचारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Make awareness about GST law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.